बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या वैयक्तित आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली. अलिकडेच तिची ‘कॉल मी बे’ वेब सीरिज देखील प्रचंड गाजली. त्यामुळे अभिनेत्रीचे प्रोफशनल आणि वैयक्तिक आयुष्य सध्या प्रकाश झोतात आहे. मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अनन्या पांडेने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे.
चंकी पांडे यांची लेक अभिनेत्री अनन्या पांडेची एक फेमस सीरिज ‘CTRL’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. या वेब सीरिजमध्ये अनन्याच्या अभिनयाचं सध्या कौतुक होत आहे. या वेब सिरीजच्या प्रमोशनदरम्यान अनन्याने आर्यन खान बाबात खुलासे केले आहेत. आर्यन खाननं तिला एकदा धमकी दिली होती. जर तू मी सांगीन ते केलं नाहीस, तर मी तुझा व्हिडीओ लीक करिन असे तिने एका मुलाखतीदरम्यान म्हंटलं आहे.
‘पूर्वी मी माझे स्वतःचे व्लॉग बनवायची. या व्लॉगमध्ये मी दिवसभर काय करते आणि काय खाते याबाबत सांगायचे. पण यापैकी एकही व्हिडीओ मी कुठेही पोस्ट केले नाही. मी, सुहाना आणि शनाया आम्ही तिघी मिळून अशा गोष्टी रेकॉर्ड करायचो… मग एकदा आर्यननं आम्हाला धमकावलेलं की, जर आम्ही त्याच्यासाठी काम केलं नाही तर, तो ते सर्व खाजगी व्लॉग आणि सर्व व्हिडीओ लीक करेल.”असे अनन्या म्हणाली. यावेळी अनन्यासोबत CTRL चे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी, कॉमेडियन तन्मय भट्ट हे देखील होते. हा व्हिडीओ नेटफ्लिक्सच्या Youtube अकाऊंटने शेअर केला आहे.
बॉलिूवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिने 2019 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या तिच्या पहिल्या चित्रपटातून तिने लोकांच्या मनात तिच अस्थित्व निर्माण केलं. अनन्या सध्या चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये झळकत आहे. तिच्या ‘कॉल मी बे’ ही वेब सीरीजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता ती लवकरच CTRL या चित्रपटात दिसणार आहे