
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि अभिनेता राहुल सोलापूरकर यांना माफ करता कामा नये. मुख्यमंत्री म्हणतात की, कोरटकर हा चिल्लर आहे. चिल्लर आहे तर मग त्याची हिंमत कशी झाली महाराजांविरोधात बोलताना? महाराजांचा अपमान करणाऱ्या सोलापूरकरविरोधात एकाही मंत्र्याने निषेध व्यक्त केला नाही. सरकार आणि राज्यपाल हे संभाजी महाराजांना विसरले आहेत. महाराज हे आपले दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना सरकारने माफ करू नये, अशी मागणी अनिल परब यांनी विधान परिषदेत केली.