
8 तासांच्या शिफ्टला अनुरागचा पाठिंबा
बॉलीवूड चित्रपटसृष्टीत काम करताना कमीत कमी 8 तासांची शिफ्ट असावी, असे मत अभिनेत्री दीपिका पदुकोणने मांडले. दीपिकाच्या या मताला दिग्दर्शक अनुराग बासू यांनी पाठिंबा दिला आहे. मलाही जास्त वेळ काम करायला आवडत नाही. माझे कलाकार याबद्दल तक्रार करत नाही. त्यामुळे मी दीपिका पदुकोणशी पूर्णपणे सहमत आहे.
डिजिटल अरेस्टची धमकी; 23 लाखाचा गंडा
जयपूरमध्ये एका 75 वर्षीय वयोवृद्ध आजोबाला डिजिटल अरेस्टची धमकी देऊन 23.56 लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. फोन करणाऱ्याने मुंबई पोलीस अधिकारी संजय कुमार बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने खरेदी केलेल्या मोबाईल नंबरचा वापर मनी लाँडरिंगसाठी आणि अश्लील मेसेजसाठी करण्यात आल्याचे सांगितले.
केरळच्या महिलेला यमनमध्ये फाशी देणार
केरळच्या पलक्कड जिह्यातील निमिषा प्रिया या महिलेला यमनची राजधानी सनामध्ये फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. 2017 मध्ये यमनच्या एका नागरिकाच्या हत्येत निमिषा दोषी आढळली होती. भारत सरकारकडून प्रयत्न करूनही तिला दिलासा मिळाला नाही. निमिषा प्रिया ही 2011 मध्ये नर्सच्या कामासाठी यमनला गेली होती.