विराटची कथा कधीही न संपणारी – अनुष्का शर्मा

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर पत्नी अनुष्का शर्माने भावनिक प्रतिक्रिया दिली. इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ती म्हणाली की, कसोटी क्रिकेटमध्ये तेच यशस्वी झाले आहेत, ज्यांच्याकडे सांगण्यासारखी कथा होती. एक मोठी कथा जी मायदेशातील, परदेशी प्रत्येक खेळपट्टीवर लिहिल्यानंतरही संपत नाही. एकूणच विराटने कसोटी क्रिकेटमध्ये लिहिलेली त्याची कथा कधीही न संपणारी असल्याची भावना अनुष्काने व्यक्त केली.