हिंदुस्थानी वंशाचे सबीह खान ऍपलमध्ये

जगप्रसिद्ध टेक कंपनी ऍपल मध्ये हिंदुस्थानी वंशाचे सबीह खान यांची चीफ ऑपरेटिंग ऑफिस (सीओओ) पदी नियुक्ती करण्यात आली. जुलै महिन्याच्या अखेरीस ते जेफ विल्यम्स यांची जागा घेतील. 2015 पासून जेफ विल्यम्स या पदावर कार्यरत होते. सबीह हे मूळचे उत्तर प्रदेशातील मुरादाबादामधील एका छोटय़ा गावातील आहेत. सबीह हे एक हुशार आणि चांगले रणनीतीकार आहेत. त्यांनी ऍपलच्या पुरवठा साखळीच्या उभारणीत चांगली भूमिका बजावली आहे. गेल्या 30 वर्षांत त्यांनी ऍपलमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत, असे ऍपलचे सीईओ टीम कुक म्हणाले.