अ‍ॅपलने पाठवला सायबर हल्ल्याचा अलर्ट

 

अ‍ॅपल आणि गुगलने संपूर्ण जगातील आपल्या युजर्सला नवीन सायबर हल्ल्याचा अलर्ट पाठवले आहेत. युजर्संनी अलर्ट राहावे, खबरदारी घ्यावी, असे या अलर्टमध्ये म्हटले आहे. कोण हॅकिंग करणार आहे तसेच या हल्ल्यामागे कोण आहे, हे ऍपल कंपनीने स्पष्ट केले नाही. ऍपलने जगातील एकूण 150 देशांतील युजर्संना या हल्ल्याबाबत अलर्ट केले आहे, असे सांगितले. ऍपलच्या अलर्टनंतर गुगलनेही एक नोटिफिकेशन जारी केले असून फोनमध्ये इंटेलेक्सा स्पायवेयरचा धोका आहे, असे म्हटले आहे.