
अॅपल कंपनी आपले तिसरे स्टोअर बंगळुरूमध्ये उघडणार आहे. येत्या 2 सप्टेंबर 2025 रोजी या स्टोअरचे उद्घाटन होणार आहे. याआधी 18 एप्रिल 2023 रोजी मुंबईतील बीकेसी येथे सीईओ टीम कुक यांच्या हस्ते पहिले अॅपल स्टोअर उघडण्यात आले होते, तर 20 एप्रिल 2023 रोजी दिल्लीतील अॅपल साकेत येथे दुसरे स्टोअर टीम कुक यांच्या हस्ते उघडण्यात आले होते. आता हिंदुस्थानात अॅपलचे तिसरे स्टोअर बंगळुरूमधील फिनिक्स मॉल ऑफ एशिया येथे उघडणार आहे.