
देशाची हवाई ताकद वाढवण्यासाठी वायुदलाला आता सहा मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट (एमआरटीटी) विमाने मिळणार आहेत. तब्बल 1.1 अब्ज डॉलरच्या या करारामुळे वायुसेनेची लांब पल्ल्याची मारक क्षमता आणि ऑपरेशनल रेंजची ताकद दुप्पट होईल. एमआरटीटीची खरेदी प्रक्रिया इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज आणि हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या सहकार्याने होईल. अत्याधुनिक एमआरटीटी विमानात हवेत इंधन भरण्याची सुविधा आहे, जेणेकरून हिंद-प्रशांत क्षेत्रसमवेत दीर्घ मिशन चालवता येईल. सध्या हवाई दलाकडे प्रामुख्याने एमकेआय टँकर विमाने आहेत. 2003 साली ही विमाने हवाई दलाच्या ताफ्यात आली. ही विमाने आता जुनी झाली आहेत. त्यांच्या मेंटनन्सची समस्या उद्भवते. नव्या तंत्रज्ञानाची मेळ बसत नसल्याने मिशन क्षमतेवर प्रभाव पडतो.
नवीन एमआरटीटी विमाने बोईंग 767 प्लेटफॉर्मवर आधारित असतील. लांब पल्ल्याचे उड्डाण, जास्त इंधन पुरवठा, आधुनिक एअर टू एअर रिफ्युलिंग सिस्टमने परिपूर्ण असतील. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान लांब पल्ल्याच्या स्ट्राईक मिशनमध्ये रिफ्युलिंगची समस्या आढळून आली होती. एका एमआरटीटीमध्ये दोन शक्तिशाली जीई इंजिन आहेत. हवेत 72 हजार ते 90 हजार किलोपर्यंत इंधन ट्रान्स्फरची क्षमता आहे. 11 हजार किमीपेक्षा जास्त उड्डाण रेंज आहे. फायटर जेट, ट्रान्सपोर्ट आणि मेडिकल इव्हॅक्युएशनसारखी मल्टी रोल मिशन, उंच पर्वतीय भागात आणि वाळवंटात ऑपरेशन राबवण्यात सक्षम.


























































