हिंदुस्थान आणि चीन या उभय देशांतील संबंधांत 75 टक्के सुधारणा झाल्याचे विधान परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते, परंतु चीनसोबतचे संबंध अत्यंत संवेदनशील असून त्यांच्यासोबत लढावेही लागेल आणि त्यांच्यासोबतही राहावे लागेल. चीनसोबतचे संबंध अत्यंत गुंतागुंतीचे आहेत, असे विधान लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी केले आहे. त्यामुळे एनडीए सरकार कितीही चीनसोबतचे संबंध चांगले असल्याचे दाखवत असली तरी खुद्द लष्करप्रमुखांनीच वास्तव मांडले आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पेजर हल्ला हा इस्रायलचा मास्टरस्ट्रोक
पेजर्स पुरवण्याची पद्धत आणि लेबनॉनमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा मास्ट्ररस्ट्रोक होता, असेही लष्करप्रमुख म्हणाले. लेबनॉनमधील पेजर स्फोटावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर तुम्ही ज्या पेजरबद्दल बोलत आहात, ते तैवानच्या कंपनीचे आहेत. त्या पेजरचा पुरवठा एका हंगेरियन कंपनीकडून केला जात होता. त्याच्या पुरवठा करण्याच्या पद्धतीचा प्लॅन आणि त्यानंतर केलेला हल्ला हा एक मास्टरस्ट्रोकच म्हणावा लागेल, असे लष्करप्रमुख म्हणाले.