
उत्तर कश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये एलओसी अर्थात नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. या वेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली. दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना एका जवानाला वीरमरण आले. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. गेल्या 13 दिवसांत दहशतवाद्यांशी लष्कराची ही तिसरी चकमक आहे.