Sheikh Hasina News : बांग्लादेश लष्कराच्या हातात, लवकरच स्थापन करणार अंतरिम सरकार

Waker-uz-Zaman

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे देश आता लष्कराच्या हातात गेले आहे. सैन्य लवकरच अंतरिम सरकार स्थापन करणार अशी माहिती सैन्य अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सैन्याचे प्रमुख जनरल वकार-उज-जमान यांनी पत्रकार परिषद घेतली. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आता सैन्य अंतरिम सरकार बनवणार अशी माहिती दिली. नागरिकांनी हिंसा पसरवू नये शांत रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी दिले.


बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये चार लाख रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी तोडफोड केली असून मोठा जमाव पंतप्रधान आवासमध्ये घुसला.


दुसरीकडे हसीना शेख हेलिकॉप्टरने भारतात पोहोचल्या आहेत असे सांगितले जात आहे. सध्या त्या पश्चिम बंगालमध्ये असल्याचेही सांगण्यात येत आहे. पण सैन्य प्रमुखांनी हसीना यांच्या देश सोडण्यावर कुठलेही भाष्य केलेले नाही.