पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांच्याविरोधात अटक वॉरंट, व्हिसा नियम मोडल्याचा आरोप

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाले आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील बंडखोर सरकारने हा वॉरंट जारी केला असून त्यांच्यावर बलुचिस्तानातील व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे मीर या बलोच यांनी अटक वॉरंट जारी झाल्याची घोषणा सोशल मीडियाद्वारे केली. ‘पाकिस्तानचे पंतप्रधान हे बलुचिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला नुकसान पोहोचवीत आहेत. विनाव्हिसा त्यांनी बलुचिस्तानात प्रवेश केला आहे. ते बलुचिस्तानातील कोणत्याही हवाई तळावर आल्यावर त्यांना अटक केली जाऊ शकते’, असे बलोच यांनी म्हटले आहे.