
मानवी अंतराळ मोहिमेतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पूर्ण करून नासाचे ‘आर्टेमिस 2’ हे ऐतिहासिक यान उद्या 11 एप्रिल रोजी पृथ्वीवर परतणार आहे. चंद्राभोवतीचा आपला 10 दिवसांचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करून चार अंतराळवीर ओरियन कॅप्सूलसह पॅसिफिक महासागरात उतरणार आहेत. 50 वर्षांनंतर प्रथमच मानवाने चंद्राच्या इतक्या जवळून प्रवास करून सुरक्षितपणे परतण्याचा हा मोठा पराक्रम केला आहे.
हा ऐतिहासिक क्षण हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार शनिवारी, 11 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजून 37 मिनिटांनी पाहता येणार आहे.कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो किनारपट्टीवर पॅसिफिक महासागरात हे यान स्प्लॅशडाऊन करेल. अंतराळ प्रेमींना ही घटना नासाच्या अधिपृत वेबसाइटसह, नासा प्लस आणि युटयूबवर थेट पाहता येणार आहे. विशेष म्हणजे हिंदुस्थानात नेटफ्लिक्सवर देखील पहाटे 4 वाजेपासून याचे थेट प्रक्षेपण सुरू होईल.
























































