अभिव्यक्ती ; विद्रोही कवितांची धग

>> डॉ. मुकुंद कुळे

पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल ज़िया उल ह़क यांची हुकूमशाही ऐन भरात होती तेव्हाची गोष्ट. 1985 च्या आसपास त्यांनी पाकिस्तानात एक फतवा काढला, “महिलांनी साडी नेसायची नाही!” कारण काय, तर साडी हा हिंदुस्थानी हिंदू स्त्रियांचा पोशाख आहे आणि पाकिस्तान तर कट्टर मुस्लिम देश… पण सगळेच काही अशा औट घटकेच्या हुकूमशहांना घाबरून गप्प बसत नाहीत. कुणी ना कुणी निघतंच निडर, जशा तेव्हा इक़बाल बानो निघाल्या! पाकिस्तानच्या प्रसिद्ध गायिका इक़बाल बानो यांनी साडी न नेसण्याच्या या फतव्याचा तीव्र निषेध केला… आणि थेट काळी साडी नेसूनच लाहोरच्या प्रसिद्ध ‘अल हमरा ऑडिटोरियम’मध्ये गेल्या. तिथे जमलेल्या हजारो लोकांसमोर फ़ैज़ साहेबांची एक प्रसिद्ध नज़्म उच्चरवात गाऊ लागल्या…

फाळणीआधी हिंदुस्थान आणि पाकिस्तानची भूमी एकच होती. या भूमीत सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक विविधता असली तरी प्रत्येकाच्या पायाखालची जमीन आणि डोक्यावरचं आकाश एकच होतं. हिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन सारेच हिंदुस्थानवासी होते. म्हणून तर खाद्य संस्कृतीपासून ते पेहराव संस्कृतीपर्यंत सगळंच सगळ्यांनी एकमेकांचं उचललं. जे मनाला-जिवाला भावलं ते आपलं मानलं. मात्र ज़िया उल ह़क यांच्यासारख्या हुकूमशहाला बहुधा ते मान्य नसावं. कारण त्यांच्या सारख्यांच्या सर्व वाटा धर्मापासून सुरू होतात आणि धर्मापाशीच येऊन संपतात. त्यातूनच मग ते कुणी काय घालावं आणि कुणी काय खावं याचे फतवे काढू लागतात, पण सगळेच काही अशा औट घटकेच्या हुकूमशहांना घाबरून गप्प बसत नाहीत. कुणी ना कुणी निघतंच निडर, जशा तेव्हा पाकिस्तानच्या प्रसिद्ध गायिका इक़बाल बानो निघाल्या! त्यांनी साडी न नेसण्याच्या या फतव्याचा तीव्र निषेध केला… आणि निषेध म्हणून थेट काळी साडी नेसूनच त्या लाहोरच्या प्रसिद्ध ‘अल हमरा ऑडिटोरियम’मध्ये गेल्या आणि तिथे जमलेल्या हजारो लोकांसमोर फ़ैज़ साहेबांची एक प्रसिद्ध नज़्म उच्च रवात गाऊ लागल्या…

‘हम देखेंगे, लाजिम है के हम भी देखेंगे…
वो दिन के जिसका वादा है
जो लौह-ए-अजल में लिक्खा है , हम देखेंगे…
जब जुल्म-ओ-सितम के कोह-ए-गराँ
रुई की तरह उड़ जायेंगे, हम देखेंगे…’

… आणि बघता बघता ऑडिटोरियममधला सारा जनसमूह उभा राहून त्यांना साथ देऊ लागला. ही ताकद इक़बाल बानो यांच्या हिमतीची-आवाजाची तर होतीच, पण त्याचबरोबर प्रसिद्ध कवी फैज़ अहमद फैज़ साहेबांच्या शब्दांचीही होती. पाकिस्तानातील तत्कालीन हुकूमशाहीच्या जणू डोळ्याला डोळा भिडवू पाहणाऱया या शब्दांनी ‘अल हमरा ऑडिटोरियम’मधल्या प्रत्येकाच्याच शरीरात प्राण फुंकले आणि बघता बघता एका व्यक्तीचा आवाज संपूर्ण समूहाचा झाला.

… पण देश कुठलाही असो, भूमी कुठलीही असो, जेव्हा जेव्हा तत्सदृश परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा ‘हम देखेंगे, लाजिम है के हम भी देखेंगे…’सारखी गाणी तगीतं बनून समोर येतात आणि सामान्य माणसांचा आवाज बनतात. महत्त्वाचं म्हणजे अशा वेळी हुकूमशहादेखील कवीच्या शब्दांना घाबरतात. कवीने उच्चारलेला विद्रोहाचा सूर त्यांना अस्वस्थ करतो… नव्हे, त्यांना भयभीत करतो. कारण विद्रोही कवितांचा हा सूर जेव्हा जेव्हा टिपेला पोचतो तेव्हा तेव्हा देशात-जगात उलथापालथ झालेली आहे. सत्तेचं-हुकूमशाहीचं तख्त धुळीला मिळालेलं आहे. ‘इन्किलाब जिंदाबाद’, ‘वंदे मातरम्’, ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’, ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है’ या आणि अशा विद्रोही गाण्यांनी हेच तर केलं. त्यांनी मृतवत झालेल्या समाजाच्या देहात प्राण फुंकले. शेवटी विद्रोहाची धग शब्दांतून जाणवायला हवी.

तशी ती धग ‘विद्रोही कविताएँ : एक श्याम विद्रोही कवी के नाम’ या कार्पामात जाणवते. प्रसिद्ध अभिनेत्री, नाटककार, सिनेनिर्माती आणि मानवी हक्कांबद्दल सातत्याने बोलणारी एक जागरूक नागरिक… अशा विविध भूमिकांतून आपल्या समोर येणाऱया रसिका आगाशे त्यांच्या ‘बीइंग असोसिएशन’ या संस्थेच्या वतीने हा विद्रोही कवितांच्या वाचनाचा कार्पाम सादर करतात. या कार्पामातील प्रत्येक गाण्यात विद्रोहाची धग आहे, अंगार आहे. खरं तर या कार्पामात सादर होणारी सगळीच गाणी फार पूर्वीच वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या काळात तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात लिहिलेली, पण ती आजच्या काळालाही तेवढीच चपखल लागू पडतात. तसंही ाढांतिगीतं किंवा विद्रोहाची गाणी कधीच नष्ट होत नाहीत. कारण त्यांच्या आत दडलेला असतो धगधगता अंगार. एखादी ाढांती घडून गेल्यावर काही काळ त्यांच्यावर राख जमा होत असेल कदाचित… पण जेव्हा जेव्हा जुलमी राजवटींचा जन्म होतो, जेव्हा जेव्हा एखादं नेतृत्व उन्मत्त होतं, जेव्हा जेव्हा सामान्यांना पायदळी तुडवलं जातं, तेव्हा तेव्हा अन्यायग्रस्तांच्या उद्रेकाचा आवाज बनून ही ाढांतिगीतंच येतात पुन्हा समोर. त्यांच्यावरची राख अलगद झटकली जाते अन् आतला शब्दनिखारा पुन्हा एकदा रसरशीत ज्वालाग्राही बनतो. मग एखादी सत्ता, एखादं पद, एखादी व्यक्ती उलथायला कितीसा वेळ लागणार?

‘विद्रोही कविताएँ’मधल्या एकेक कवी आणि त्याची कविता अगदी निरखून-पारखून घेतलेली. प्रत्येक कवीने आपल्या आत दडलेल्या विद्रोहाचा अगदी सच्चा सूर आपल्या कवितेत पकडलेला. कवी तरी कोण? तर फैज़ अहमद फैज़, बाबा नागार्जुन, गोरख पांडे, पाब्लो नेरुदा, सर्वेश्वरदयाल सक्सेना, मंगलेश डबराल, रमाशंकर यादव (विद्रोही), अदम गोंडवी, पाश, राहत इंदौरी, देवीप्रसाद मिश्र, अमृता प्रीतम, मार्टिन नीमोल्लर, अंशु मालवीय, रसिका आगाशे, सबिका अब्बास नकवी… असे कितीएक देशातले, देशाबाहेरचे, पण प्रत्येकाची कविता काहीएक सांगू पाहते, काहीएक मांडू पाहते. आजूबाजूच्या कराल वास्तवावर आपल्यासारख्या सर्वसामान्यांची नाममुद्रा उमटवू पाहते. म्हणूनच या विद्रोही कविता म्हणजे एक प्रकारचं भाष्यच आहे काळावरचं, परिस्थितीवरचं, वाईट रूढीचं, अतिरेकी जातीयता आणि धर्मांधतेवरचं आणि त्यातील राजकारणावरचंही! अगदी उदाहरणच देऊन बोलायचं तर रसिका आगाशे यांनी स्वत लिहिलेल्या कवितेचंच देता येईल. ‘दही हांडी’ नावाच्या कवितेत त्या अगदी सहज लिहितात-

कैसे करे अब बात…
मै दही हांडी पर ट्रैफिक क्यू है पूछती हूँ
तुम जुम्मे की नमाज़ की तरफ इशारा करते हो
मै उना की बात करती हूँ
तुम गायकी महानता गाते हो
मै स्कूल बस पर हमले की बात करती हूँ
तुम कश्मीर उठाये चले आते हो
… और जब तुम बात सुनने को तय्यार ही नही
तो कैसे समझाऊँ तुम्हे
के मुझे जुम्मे के दिन भी ट्रैफिक से परेशानी होती है
और उसी दिन क्यूँ, उन सारे दिन
जब लोक अपना अपना मज़हब
अपने गले मे लपेटे सडक पर उतरते है
और एक धार्मिक उन्माद में
बाकी दुनिया को भूल जाते है…

‘विद्रोही कविताएँ’मधल्या सगळ्याच कविता अगदी टोकदार आहेत. विशेषत आजच्या काळावर परखड भाष्य ठरतील अशा आहेत. म्हणूनच 1966 साली लिहिली गेलेली देवीप्रसाद मिश्र यांची ‘वे मुसलमान थे…’ ही कविता आजही तेवढीच समकालीन ठरते –

‘वे न होते तो लखनऊ न होता, आधा इलाहाबाद न होता
मेहराबें न होतीं, गुम्बद न होता, आदाब न होता
मीर म़कदूम मोमिन न होते, शबाना न होती
वे न होते तो उपमहाद्वीप के संगीत को
सुननेवाला ख़ुसरो न होता

वे न होते तो पूरे देश के गुस्से से बेचैन होनेवाला कबीर न होता
वे न होते तो भारतीय उपमहाद्वीप के
दुख को कहनेवाला ग़ालिब न होता’

देशातील मुसलमान बांधवांच्या अस्तित्वाबद्दलच शंका उपस्थित केली जाते. खरं तर आज गरिबी-बेरोजगारीसारखे प्रश्न जनतेसमोर ‘आ’ वासून उभे असताना जात-धर्म यांसारखे मुद्देच फिजूल आहेत, पण राजकारण तर त्यावरच चालत असतं. म्हणून मग पुनपुन्हा तेच मुद्दे उकरून काढले जातात.

‘विद्रोही कविताएँ’मध्ये सादर होणाऱया साऱयाच कविता एकापेक्षा एक सरस आहेत… नव्हे, बंदुकीतून सुटलेले छर्रे कसे पक्ष्यांना अर्धमेलं करतात, तशा आहेत. म्हणजे छर्रे लागून पक्षी मरत नाही, नुसता तडफडत राहतो. आपणही सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय परिस्थितीवर भाष्य असलेल्या या कविता ऐकतो आणि अस्वस्थ-बेचैन होतो. पायात राहून गेलेला काटय़ाचा तुकडा ठसठसत राहावा तशी ही ठसठस, ही बेचैनीच आवश्यक असते कुठल्याही उठावासाठी… आणि ाढांतिगीतांच्या ठायी, विद्रोही कवितांच्या ठायी समाजाला पेटवण्याची ताकद ठासून भरलेली असते. ‘विद्रोही कविताएँ’ कार्पामात ज्यांच्या कविता सादर केल्या जातात, ते बहुतेक सारेच विद्रोही कवी आहेत. स्वान्त सुखाय कविता न लिहिता त्यांनी ती समाजाच्या उत्थानासाठी सत्ताधारी-हुकूमशहा-संस्कृती रक्षकांच्या विरोधात लिहिलेली आहे. सामान्य माणूस हा त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. आज तोच सामान्य माणूस केंद्राकडून परिघाकडे ढकलला जात आहे आणि म्हणूनच त्यांच्या कवितांची आज खरी गरज आहे!
> [email protected]