
रे राजहंस किमिति त्वमिहागतोसि योसौ बक स इह हंस इति प्रतीत।
तद्गम्यतामनुपदेन पुन स्वभूमौ यावद्वदन्ति बक एष न मूढलोकाः।।
अरे राजहंसा, तू इथे का आला आहेस? येथे तर जो बगळा आहे, त्यालाच लोक हंस समजतात.
म्हणून तू ताबडतोब आपल्या देशात परत जा; नाहीतर हे मूर्ख लोक तुलाच बगळा म्हणू लागतील.
ज्या ठिकाणी अयोग्य लोकांना मान आणि योग्य लोकांची कदर नाही, तेथे खरा गुणी माणूस गेला तर त्याचीही किंमत उरत नाही.
उलट त्याची ओळखच चुकीची केली जाते. जिथे अज्ञानाचे राज्य आहे, तिथे गुणी माणसाचे मूल्य होत नाही;
त्यामुळे अशा ठिकाणापासून दूर राहणेच शहाणपणाचे आहे. आजच्या काळात तर याची प्रचिती सहज येते.
डॉ. समिरा गुजर-जोशी


























































