लेख – युद्धाचा वणवा जलसाठ्यांकडे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजीव मुळ्ये

‘आगामी महायुद्ध हे पाण्यावरून लढले जाऊ शकते’ असे भाकीत मागील काळात सातत्याने कानी पडत असे. सध्या सुरू असलेल्या आखातातील युद्धादरम्यान या विधानाची प्रचीती येताना दिसत आहे. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नुकताच असा खळबळजनक आरोप केला आहे की, अमेरिकन हल्ल्यात होर्मुझ सामुद्रधुनीजवळील केशम बेटावर असलेले खारे पाणी गोड करण्याचे (डिसेलिनेशन) मुख्य संयंत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. हे युद्ध केवळ दोन विचारसरणींमधील किंवा सत्ता संघर्षाचे राहिलेले नाही, तर ते नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विनाशाचे निमित्त ठरत आहे.

इराणच्या अण्वस्त्रांवरून सुरू झालेला हा संघर्ष आता केवळ सीमेवरील चकमकीपर्यंत मर्यादित न राहता, मानवी अस्तित्वाचा पाया असलेल्या पाणीपुरवठा आणि त्याच्या सुरक्षा यंत्रणांच्या नाशापर्यंत पोहोचला आहे. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नुकताच असा खळबळजनक आरोप केला आहे की, अमेरिकन हल्ल्यात होर्मुझ सामुद्रधुनीजवळील ‘केशम’ बेटावर असलेले खारे पाणी गोड करण्याचे (डिसेलिनेशन) मुख्य संयंत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या एका हल्ल्याचा परिणाम इतका भीषण आहे की, परिसरातील सुमारे 30 गावांचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरीनमधील जल शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य केल्यामुळे आता हे युद्ध तेल आणि लष्करी तळांच्या पलीकडे जाऊन थेट पाण्यावर येऊन ठेपले आहे.

खाडी देशांमधील मोठी लोकसंख्या ही नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांच्या अभावामुळे याच कृत्रिम प्रकल्पांवर अवलंबून आहे, त्यामुळे या केंद्रांना लक्ष्य करणे म्हणजे संपूर्ण नागरी वस्तीला मृत्यूच्या खाईत ढकलण्यासारखे आहे.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अनेक वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती की, पुढचे जागतिक युद्ध हे पाण्यासाठी होईल. सध्या मध्य आशियामध्ये सुरू असलेली परिस्थिती पाहता हे विधान आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. आखाती देशांनी आता आपल्या तेल विहिरींपेक्षा या जलसंयंत्रांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यास सुरुवात केली असून या पेंद्रांभोवती आधुनिक क्षेपणास्त्रs आणि ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. या प्रकल्पांना होणारी थोडीशी इजादेखील संपूर्ण देशाचे जनजीवन विस्कळीत करण्यास पुरेशी आहे. विशेषतः बहरीन, कतार आणि कुवेत यांसारख्या देशांकडे पाण्याचे पर्यायी स्रोत अत्यंत कमी असल्याने त्यांना या युद्धाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. इराणसाठी हे युद्ध केवळ लष्करी नसून ते अस्तित्वाचे युद्ध बनले आहे, कारण त्यांच्या स्वतःच्या जलसाठय़ांवरही मोठे संकट आले आहे.

अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर केलेल्या रासायनिक ‘टॉसिक बॉम्ब’च्या हल्ल्यामुळे तिथली स्थिती अत्यंत भयावह झाली आहे. या हल्ल्यात तेहरानमधील 30 मोठे जलसाठे निकामी झाले असून हवेत विषारी धूर पसरला आहे. या प्रदूषणामुळे शहरात ‘ऑसिड रेन’ म्हणजेच आम्ल पावसाची भीती निर्माण झाली आहे. नैसर्गिक जलाशयांच्या पृष्ठभागावर तेलाचा आणि रसायनांचा जाड थर जमा झाल्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. या संकटामुळे तेहरानमधील सुमारे 90 लाख नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ झाले असून शहरात अघोषित संचारबंदी लागू करण्यात आली आहे. केवळ इराणच नाही, तर लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळांवरदेखील अशाच प्रकारचे टॉसिक बॉम्ब टाकले जात आहेत, जे पिकांचा नाश करण्यासोबतच जमिनीखालील पाण्याचे साठे कायमचे दूषित करत आहेत.

सौदी अरेबिया, कुवेत, ओमान आणि कतार यांसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेचा कणा तेल असले तरी त्यांच्या अस्तित्वाचा आधार जल शुद्धीकरण संयंत्रे हाच आहे. या देशांतील 90 टक्के पिण्याचे पाणी समुद्राच्या खाऱया पाण्यावर प्रक्रिया करून मिळवले जाते. एका जुन्या अमेरिकन राजनैतिक दस्तऐवजात असा इशारा देण्यात आला होता की, जर सौदी अरेबियातील ‘जुबेल’ जल पेंद्राला किंवा तिथल्या पाइपलाइनला हानी पोहोचली, तर राजधानी रियाधला अवघ्या सात दिवसांत रिकामे करावे लागेल. यावरून या देशांची पाण्याची गरज आणि त्यांची हतबलता लक्षात येते. खाडी देशांनी आपल्या तलावांमध्ये आणि पाणीपुरवठा साखळीत मोठी गुंतवणूक केली असली तरी युद्धाच्या काळात हे सर्व साठे असुरक्षित ठरत आहेत. या भीषण संकटाच्या काळात इस्रायलने मात्र जल व्यवस्थापनात स्वतःला जागतिक महाशक्ती म्हणून सिद्ध केले आहे. इस्रायलकडे समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवण्याचे जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान आहे. त्यांनी केवळ कायमस्वरूपी प्रकल्पांवर विसंबून न राहता ‘गेलमॉबाईल वॉटर फिल्ट्रेशन प्लांट’ विकसित केले आहेत. हे संयंत्र म्हणजे एका ट्रकमध्ये बसवलेले फिरते शुद्धीकरण केंद्र असून ते कोणत्याही नैसर्गिक किं

जमिनीची नैसर्गिक रचना अशी असते की पावसाचे पाणी एका मर्यादेपर्यंतच जमिनीत मुरते. मात्र, अति उपसामुळे जमिनीखाली पोकळी निर्माण होत असून तिथे समुद्राचे खारे पाणी शिरू लागले आहे. यामुळे जमिनीतील गोडय़ा पाण्याचे साठे कायमचे खराब होत आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे पश्चिम अंटार्क्टिकातील बर्फाचे थर वेगाने वितळत असून समुद्र पातळी वाढत आहे. याचा धोका केवळ बांगलादेश किंवा मार्शल बेटांनाच नाही, तर भारतातील मुंबईसारख्या महानगरांनाही आहे. वाढत्या समुद्र पातळीमुळे किनारपट्टीवरील निवासी भागांतील विहिरी आणि कूपनलिकांमध्ये समुद्राचे खारे पाणी मिसळत आहे. यामुळे भविष्यात या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ पडू शकतो. इराण आणि अमेरिका यांच्यातील या संघर्षामुळे किनारपट्टीवरील व खाडी देशांतील पिण्याच्या पाण्याचे संकट आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिले जात आहे. हे युद्ध केवळ दोन विचारसरणींमधील किंवा सत्ता संघर्षाचे राहिलेले नाही, तर ते नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विनाशाचे निमित्त ठरत आहे. जर ही परिस्थिती लवकर आटोक्यात आली नाही, तर भविष्यात शस्त्रास्त्रांपेक्षा जास्त मृत्यू हे तहानेमुळे होतील अशी चिन्हे दिसत आहेत. पाण्याचे हे राजक

या संकटामुळे जगाला आता जल संवर्धनाचे आणि शुद्धीकरणाच्या नवनवीन तंत्रज्ञानाचे महत्त्व नव्याने समजून घेण्याची वेळ आली आहे.

(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत)