मुद्दा – गोधनाचे महत्त्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संध्या काटदरे

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. याकरिता आपल्याला शेतीवर अवलंबून राहावे लागते. तृणधान्ये-गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, वरई इ. द्विदलधान्ये हरभरा, मूग, तूर, उडीद, मटकी इ. आणि तेलबिया म्हणजे तीळ, शेंगदाणे, सूर्यफूल, करडई, जवस, मोहरी इ. गळिताची धान्येही शेतीतूनच मिळू शकतात. कापसापासून उत्तम सूत मिळते, ज्याचे वस्त्राsद्योगात महत्त्वाचे आणि मानाचे स्थान आहे. याशिवाय ताग, घायपात, अंबाडी इ. अन्य वनस्पतींपासूनही धागे तयार केले जातात. घरबांधणीसाठी लागणारे लाकूड तर वृक्षांशिवाय मिळू शकत नाही.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. म्हणून शेतकऱ्यांना ‘अन्नदाता’ असे म्हटले जाते. माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्राr यांनी शेतकऱ्यांचे आणि सैनिकांचे महत्त्व देशवासीयांना कळावे म्हणून ‘जय जवान जय किसान’ हे घोषवाक्य केले.

शेतीसाठी भारतीय देशी गाईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आईच्या दुधाइतकेच महत्त्व गाईच्या दुधाला आहे. बाळाला आईचे दूध मिळत नसेल तर गाईचे दूध दिले जाते. गाईचे दूध सर्वांसाठी ‘अमूल्य’ आहे.

दूध उत्पादनामुळे शेतकऱ्यांना नगद पैसे मिळतात. तसेच शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी बैलही मिळतात. गाईचे शेणखत आणि गोमूत्र यांच्या वापराने शेती उत्पादन वाढते, जमिनीचा पोत सुधारतो आणि किडींचा, कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देशी गाईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

देशी गाईच्या दुधात प्रथिने, पॅल्शियम, सुवर्ण, लोह हे घटक विपुल प्रमाणात असतात. लहान मुलांना देशी गायीचे दूध दिल्याने त्यांची प्रतिकार क्षमता आणि बुद्धिमत्ता आणि बल वाढते. याउलट जर्सी, विदेशी गाईंच्या दुधामुळे मानवी शरीर सहजतेने रोगजंतूंना बळी पडू शकते.

ताज्या गोमूत्राच्या सेवनाने पोटाचे विकार बरे होतात. पंचगव्य म्हणजे गोमूत्र, गाईचे शेण, दही, दूध आणि तूप यांच्या मिश्रणाने देहाची अंतर्गत शरीर शुद्धी होते. म्हणून धार्मिक विधींच्या वेळी पंचगव्य घेण्याची पद्धत आहे. देशी गाईंच्या पाठीवर वशिंड (मासल उंचवटा) असतो. त्यापासून निघून शेपटीपर्यंत जाणारा एक रज्जु असतो, त्याला सूर्यकेतु नाडी असे म्हणतात. या नाडीमुळे अवकाशातील ‘कॉस्मिक’ किरण गाईकडून शोषले जातात. याचा लाभ आपण गाईच्या पाठीवरून हात फिरवला किंवा गाईची शेपटी अंगावरून फिरवली की आपल्याला होतो. डोळ्यावरून गाईची शेपटी फिरवल्याने दृष्टी चांगली होते. गोमूत्रापासून तयार केलेल्या गोळ्यांमुळे अनेक दुर्धर रोगांवर नियंत्रण मिळवता येते असे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.

गाईच्या शेणाने सारवलेल्या घरामुळे आपले घातक दूषित वातावरणापासून रक्षण होते. देशी गाईच्या शेणाच्या गोवरीच्या धुरामुळे वातावरणाची शुद्धी होते. म्हणूनच अग्निहोत्रासाठी तिचा वापर केला जातो.

म्हणूनच गाईला पवित्र मानले जाते. गाईची सेवा केल्याने मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते. आपल्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. म्हणून मंगल प्रसंगी किंवा धार्मिक अनुष्ठानापूर्वी गाईला घास देणे, तिची पूजा करणे अशी प्रथा आहे.

दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर भारतातही गोहत्या रोखण्यासाठी काही ठोस प्रयत्न झाले नाहीत. आधीच्या राजवटीत ‘गोहत्याबंदी’साठी उपोषण करणाऱ्या साधुसंतांवर (ज्यामधे करपात्रीकर महाराजांसारखे थोर संत होते.) गोरक्षणासाठी आग्रही असणाऱ्या गोरक्षकांवर अमानुष गोळीबार केला गेला. गोसंवर्धनाकडे लक्ष देण्याऐवजी शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांच्या माथी जर्सी गाई मारल्या गेल्या. ज्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे सर्व बदलण्यासाठी एका मोठय़ा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
27एप्रिल 2026 हा दिवस ‘गो सम्मान अभियान’ दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. तत्पूर्वी या अभियानांतर्गत ठिकठिकाणी शासनाला निवेदने देण्यात येणार आहेत.
सर्व विश्व अणुयुद्धाच्या उंबरठय़ावर उभे आहे. अशा वेळी स्वतःचे रक्षण होण्यासाठी देशी गाईचे रक्षण होणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन देशी गोधनाचे रक्षण होण्यासाठी कटिबद्ध होऊया.

धर्मो रक्षति रक्षितः