अनवट काही – पंढरपूर देवस्थानची ऐतिहासिक माहिती

>> अशोक बेंडखळे

[email protected]

पंढरपूर विठ्ठल मंदिरामुळे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला अनेक भाविक पंढरपूरची वारी करण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्र माहात्म्यामुळे पंढरपूरला दक्षिणेची काशी म्हटले जाते. अशा या महाराष्ट्राच्या स्फूर्तिस्थानावर संशोधन व पुराव्यांचे आधार देऊन लिहिलेले एक छोटेखानी पुस्तक इतिहास संशोधक ग. . खरे यांनी लिहिलेले नुकतेच वाचनात आले. लेखकाने स्वतच पदरमोड करून ‘श्री विठ्ठल आणि पंढरपूर’ हे पुस्तक साधारणतः 1938 साली प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकातील सर्व माहिती ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे दिली असल्यामुळे तिला मत्त्व आहे.

पंढरपूरमधील मुख्य दैवत विठोबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र व बाहेरून लोक येतात. विशेषत कर्नाटक, तेलंगणा प्रांतातील जारो लोक येतात. भक्तिमार्गातील ज्ञानदेव, तुकाराम चोखामेळा इ. महाराष्ट्रातील संतांनी विठोबाला आपले आराध्य दैवत मानले त्याचप्रमाणे चौंडरस, पुरंदरदास, कनकदास इ. कर्नाटकी संत कवींनी सुध्दा आपले दैवत मानल्यामुळे त्या भागातून भक्तगण पंढरपुरास येतात. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीचे वर्णन लेखक असे करतो, चौखांबी मंडपातून गर्भागारामध्ये विटेवर उभी असलेली मूर्ती म्हणजे पांडुरंग. मूर्तीची नावे विठ्ठल  पांडुरंग, पंढरीनाथ, विठ्ठलनाथ इ. विविध उच्चारली जातात. 1873 पर्यंत देवाच्या पायास कवटाळता येत होते, पण एका बैराग्याने देवाच्या पायावर धोंडा टाकला व मूर्ती दुखावली. त्या वेळेपासून पायावर फक्त डोके ठेवता येते अशी दुर्मिळ माहिती लेखक सज देतो.

पंढरपूर व तेथील देव श्री विठ्ठल याविषयी मुसलमानी रियासत, शिवशाही व पेशवाई या तिन्ही काळातील अनेक उल्लेख सांगून लेखक मध्य युगीन उल्लेखांचा निर्देश करतो. जुन्यातला जुना उल्लेख पंढरपूरमधील शके 1199. च्या शिलालेखात येतो. त्यात पंढरपुरास पंडरगे आणि विठोबाला विठ्ठल असे संबोधिले आहे. तसेच पंढरपुरास पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, पंडरिपूर, फागनिपूर, पौंडरिक क्षेत्र, पंडरगे, पांडुरंगपल्ली अशी विविध नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आहेत तर विठोबास पंढरीराय, विठोबा, विठाई, माऊली अशा नावांमध्ये विठ्ठल हेच नाव मुख्य आहे आणि विठ्ठल हा शब्द विष्णूच्या शब्दाचा अपभ्रंश आहे हे सर्व विद्वानांस मान्य आहे.

विठ्ठलाच्या मूर्तीविषयी लेखकाने काही निष्कर्ष मांडले आहेत. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये अनेक ठिकाणी विठोबाचे वर्णन आले आहे. विठोबास चार हात आहेत, दोन हात कमरेवर तर दोन हातात शंख, चक्र आहेत. जवळ दहीभाताची शिदोरी, पावा काठी वगैरे गोपवेष दाखवणाऱ्या वस्तू आहेत. जवळ राही रखुमाई आहेत आणि सध्याच्या विठोबाचे हातात शंख, चक्र नाहीत, राही रखमाई नाहीत, डोक्यावर शंकराचे लिंग असल्याची खुणा नाही. तेव्हा ल्लीची मूर्ती प्राचीन वा मध्य युगीन नाही तर अर्वाचीन असावी, या निष्कर्षांपर्यंत तो येतो. एकूण महाराष्ट्रातील विठ्ठलभक्ती मध्य युगाच्या आरंभाची असून विठ्ठल मूर्ती मात्र मध्ययुगीन नाही. औरंगजेब आणि अफजलखान यांचा पंढरपूरच्या जवळ कित्येक वर्षे तळ होता. तेव्हा दोघांच्या तडाख्यातून पंढरपूरची मूर्ती सूरक्षित राहिली असेल असे वाटत नाही. पंढरपूरची मूर्ती विजयनगरला नेली होती (शके 1435). विजयनगरच्या अनेक शिलालेखांमधून विजय विठ्ठल वा विठ्ठलस्वामींच्या विषयी वा देवळांविषयी माहिती मिळते. ही मूर्ती 1486 पर्यंत विजयनगरला होती याचे अनेक पुरावे मिळतात आणि भानुदास ( एकनाथांचा पणजा) याने ती परत आणली असाही प्रवाद आहे.

संत ज्ञानेश्वरांच्या अनेक ओव्यांमध्ये पंढरपूर किंवा विठोबा यांचा उल्लेख आला आहे. एका ओवीत देवालयाच्या कळसाचे दर्शन घेतले असता देवालयातील देवतेचे दर्शन झाले असे मानण्याचा प्रघात त्यावेळी होता असे निर्देशिले आहे. पंढरपूरला आजही हा प्रघात चालू आहे आणि जारो भाविक केवळ कळसाचे देशन होताच परत फिरतात, कारण कलशदर्शनाने विठोबाचे दर्शन झाले असे समजतात. लेखकाच्या मते विठोबाच्या डोक्यावर शिवलिंग नाही. तो अत्यंत साधा असा मुकुट आहे. हे स्थान पूर्वा बौद्धांचे होते, आता हिंदूंचे झाले. सध्या अनेक जैन विठोबाची मूर्ती आपली देवता मानतात. ती नेमिनाथ तीर्थंकाराची आहे असेही म्हटले जाते. ब्रिटिश अभ्यासक मि. काझिन्सच्या मते, महाद्वारासमोर पोलीस चौकी आहे त्या ठिकाणी विठोबाचे मूळ देऊळ होते. अशी काही वेगळी माहिती या पुस्तकामधून मिळते आणि ती विठ्ठलप्रेमींसाठी वाचनीय आहे.