
भारतामध्ये जगभरातील सर्वात जास्त थॅलेसेमिया रुग्ण आढळून येतात. दरवर्षी 1.5 लाख रुग्ण आणि 7000-8000 नवीन जन्म ही भारतामध्ये थॅलेसेमियाची आकडेवारी आहे. एकटय़ा महाराष्ट्रात 12,000 थॅलेसेमिया रुग्ण असल्याचे अनुमान आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे रोग संक्रमणाचे चक्र मोडून काढण्यासाठी टार्गेटेड प्रतिबंध/उपचार योजनांची तातडीची आवश्यकता आहे.
महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रगतिशील उपाययोजनांमध्ये सर्वसमावेशक तपासणी, काउंसेलिंग आणि आरोग्य देखभाल व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण योजनांचा समावेश आहे. प्रतिबंध व रुग्ण देखभाल या दोन्हींकडे योग्य लक्ष दिले जावे हा यामागचा उद्देश आहे.
थॅलेसेमिया पेशंटस अॅडहोकसी ग्रुपला (टीपीएजी) महाराष्ट्र सरकारने थॅलेसेमियाचा प्रतिबंध आणि त्यावरील प्रभावी उपचार यासंदर्भात निर्णायक पावले उचलण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिले आहेत. ‘थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्र’च्या दिशेने जाण्यासाठी एक मानक कार्यप्रणाली विकसित करण्यासही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ‘टीपीएजी’ला सांगितले आहे. टीपीएजीच्या सदस्य सचिव अनुभा तनेजा मुखर्जी यांनी सांगितले, टीपीएजीमध्ये आम्ही थॅलेसेमियाच्या निवारणासाठी महाराष्ट्र सरकारच्या कटिबद्धतेचे काwतुक करतो. हा उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी सर्व आवश्यक सहाय्य पुरवण्यासाठी आम्ही तयार आहोत. इतर राज्यांसाठी महाराष्ट्र एक आदर्श, अनुकरणीय उदाहरण आहे. थॅलेसेमियाचे वाढते ओझे कमी करण्यासाठी थॅलेसेमियामुक्त भारत अभियान आवश्यक आहे. राष्ट्रीय पातळीवर याची नितांत आवश्यकता आहे.
राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांच्या समर्थनार्थ टीपीएजीकडून पुढील धोरणात्मक कार्यवाहीची शिफारस करण्यात आली आहे…
1. रक्त संक्रमणासाठी एनएटी परीक्षण अनिवार्य केले जावे –
संक्रमणातून पसरणारे संसर्ग रोखण्यासाठी सर्व रक्तपेढय़ांमध्ये न्युक्लिक ऑसिड परीक्षण (एनएटी) अनिवार्य करून जास्तीत जास्त रक्त सुरक्षा सुनिश्चित केली जावी.
2. वाहक ओळखला जावा यासाठी युनिव्हर्सल स्क्रीनिंग –
राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये थॅलेसेमिया चाचणीचा समावेश केला जावा, ज्यामध्ये विवाह-पूर्व आरोग्य तपासणीदेखील असते. त्यामुळे वाहक लवकरात लवकर ओळखले जातील आणि त्यांना सूचित केले जाऊ शकेल.
3. जीन थेरेपी आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण सहाय्य –
अधिक जास्त फंडिंग, संशोधन पायाभूत सोयीसुविधा आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून उपचारांची उपलब्धता वाढवली जावी.
4. सहज आणि स्वस्त देखभाल –
आयुष्मान भारत आणि पीएम-जेएवाय अंतर्गत थॅलेसेमिया उपचार योजनांचा समावेश केला जावा जेणेकरून सर्व रुग्णांना कमी खर्चात, संपूर्ण जीवनभर देखभाल मिळत राहील.
5. आवश्यक औषधे उपलब्ध होतील याची हमी –
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि फार्मसीच्या माध्यमातून महत्त्वाची औषधे सहज उपलब्ध व्हावीत.
या महत्त्वाकांक्षी आणि अत्यावश्यक उपक्रमामध्ये महाराष्ट्र सरकारला पाठिंबा देण्यासाठी टीपीएजी बांधील आहे. आपण सर्व जण मिळून थॅलेसेमियाच्या काळ्या सावलीपासून मुक्त, निरोगी, मजबूत भारत निर्माण करू शकतो.