आभाळमाया – ग्रहांचे ‘हॅबिटेबल झोन’

>> वैश्विक

एखादा  ग्रह आपल्या पृथ्वीसारखा वसाहत योग्य कधी होतो? त्याचे बरेच निकष आहेत. वसाहत योग्य म्हटल्यावर स्वार्थी माणूस फक्त स्वतःचा ‘वसाहती’चा विचार करतो. त्यासाठी निसर्गाची हानी झाली तरी त्याला चालते. परंतु मुळात निसर्गाचा ऱ्हास करून माणसांना पृथ्वीवर राहताच येणार नाही. कारण आपणही त्या निसर्गाचाच एक भाग आहोत हे आपण सोयीस्कररीत्या विसरतो. त्याची ‘भरपाई’ वगैरे करण्याच्या गोष्टी करतो. जंगलतोड झाली तर कोटी कोटी झाडं लावू म्हणतो. मात्र झाडं लावणे म्हणजे वनसंपदा निर्माण करणे नसते. ती एक परिपूर्ण पर्यावरणीय नैसर्गिक व्यवस्था असते. या ‘नॅचरल इकोसिस्टिम’ची उणीव माणसाला जाणवत नाही असेही नाही, पण इतर अनेक कारणांसाठी त्याकडे दुर्लक्ष होतो.

विराट विश्वात आपल्याला आतापर्यंत ठाऊक असलेला सजीव-संपन्न असा एकमेव ग्रह आहे, तो म्हणजे आपली पृथ्वी. अवकाशातून ती प्रचंड जलसाठय़ामुळे निळी दिसते. या पाण्याची निर्मिती आणि त्यातून फुललेला ‘फ्लोरा’ आणि अस्तित्वात आलेले सजीव याची सांगड घालून हा ग्रह ‘जिवंत’ झालेला आहे.

याला खगोलशास्त्र्ााrय कारणं आहेतच. पृथ्वीचे सूर्यमालेतले ‘हॅबिटेबल झोन’ किंवा ‘वसाहत योग्य क्षेत्रा’तील अस्तित्व हे मूळ कारण. आपला ग्रह गुरूच्या जागी असता किंवा बुधाच्या जागी असता तर अतिउष्णता आणि अति थंडी, शिवाय गुरूवरचे वायूरूप वातावरण अशा अनेक गोष्टींमुळे तो आजच्यासारखा बहरलेला दिसला नसता. पथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर आणि पृथ्वीला योग्य अंतरावर लाभलेला योग्य आकाराचा उपग्रह (चंद्र) या दोन्ही गोष्टींचा ‘आपण’ असण्यावर झालेला जैविक परिणाम आहे.

ज्या ‘हॅबिटेबल झोन’मध्ये आपण आहोत, त्याजागी मंगळ आणि गुरू यांच्यात आहे तसा अशनींचा पट्टा असता तरीही, सध्या आपल्यासकट जी ‘जीवसृष्टी’ दिसते ती शक्यच झाली नसती. आपण सूर्याभोवतीच्या अशा ‘गोल्डी लॉक्स झोन’मध्ये आहोत की, सूर्यापासूनच्या योग्य अंतरामुळे आपल्या ग्रहावर समुद्राचे पाणी टिपून आहे. एकेकाळी ते तसेच मंगळावर होतं म्हणतात. पण आता ध्रुवीय भाग वगळता मंगळ कोरडा ठणठणीत लाल ‘अंगारक’ आहे. शिवाय तिथे अति सुक्ष्म जीव सापडले असले किंवा भाजीपाला वाढवणे शक्य झाले तरी पुरेसा कार्बन आणि माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन किती नेणार? मंगळावरचा जलसाठय़ाचा शोध घेऊन आधी त्या जलविघटन करून हायड्रोजन-ऑक्सिजन वेगळे करायचे इत्यादी संकल्पना प्रयोगाच्या पातळीवर ठीक आहेत आणि त्या यशस्वी होऊन एखाद्या पृत्रिम
‘कॅप्सूल’मध्ये काही काळ राहताही येईल. मात्र इतर बाबतीत जवळपास पृथ्वीसारखाच असलेला हा ग्रह केवळ पृत्रिम प्रयत्नांनी फळाफुलांनी बहरलेला, विपुल जल आणि अन्नधान्य असलेला करणे फारच कठीण. तेवढे श्रम आणि पैसा आहे तो पृथ्वी नावाचा निसर्गदत्त ग्रह ‘निरोगी’ करण्यात खर्च केला तर इथली सजीवसृष्टी सुखी होईल.

पृथ्वीवर सजीव निर्माण होऊन ते वाढण्यात, कधीकाळी पाण्याचे साठे घेऊन कोसळलेले लक्षावधी धूमकेतू, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने जैविक प्रगतीला झालेली मदत, पृथ्वीच्या योग्य तेवढय़ाच साडेतेवीस अंशात कललेल्या ‘अक्षा’मुळे निर्माण होणारे ऋतुचक्र अशा अनेक गोष्टींचा समुच्चय आपल्याला वसाहतयोग्य बनवण्यासाठी उपयुक्त ठरला आहे.

आपल्यासारख्या जैविकदृष्टय़ा प्रगत ग्रहाचे आपण आजवरचे एकमेव उदाहरण असलो तरी विराट विश्वाच्या ??वर अविश्वास दाखवण्याचे कारण नाही. अनेक योगायोगांची जुळणी होऊन पृथ्वीसारखे जीवन तयार होणे म्हणजे एखाद्या विभाजनाचे सर्व भाग सुटे करून त्यातून केवळ एका वादळाने पुन्हा विमान तयार होण्यासारखे आहे, असे पूर्वी म्हटले जायचे. पण ‘तसंच’ घडत असेल तर पृथ्वी आणि तिथले जैविक चक्र कसे अस्तित्वात आले? याचा अर्थ हा ‘प्रयोग’ आपल्या अस्तित्वासह एकदा यशस्वी झालेलाच आहे. मग इतरत्र जीवसृष्टी नसेल?

आता तर असेही म्हटले जाते की, आपल्या आकाशगंगा दीर्घिकेतल्या (गॅलॅक्सीतल्या) अब्जावधी ताऱ्यांपैकी अनेक सूर्यासारखे असतील आणि त्यांच्याभोवती ग्रहमाला फिरत असतील. त्यामध्ये पृथ्वीसारखे ‘हॅबिटेबल झोन’मध्ये येणारे ग्रहसुद्धा असतीलच! …आणि असतील म्हणजे किती? …जर सुमारे 40 अब्ज पृथ्वीसदृश ग्रह केवळ आपल्या एका आकाशगंगेत असण्याची शक्यता वर्तवली जाते. त्या त्या ‘सूर्या’भोवतीच्या ग्रहमालेतले तिथल्या ‘पृथ्वी’चे वसाहतयोग्य स्थान निराळे असू शकते. जीवसृष्टीचा वेगळा प्रकारही तिथे विकसित झालेला असू शकतो.

अशा ‘सूर्या’चा आणि ‘पृथ्वी’चा शोध घ्यायचा तर ‘जेम्स वेब’सारख्या अवकाशी दुर्बिणी आहेतच. पण आपल्या ‘जवळ’चा तारा ‘प्रॉक्झिमा सेन्टॉरी’ जर साडेचार प्रकाशवर्षे दूर असेल तर बाकीच्यांच्या संपर्काची काय कथा! तरीही वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरूच आहेत. या वर्षाच्या अखेरीस व्हॉएजर-1 हे यान सुमारे 26 अब्ज किलोमीटर अंतरावर पोचून एक ‘प्रकाश दिवस’ पूर्ण करणार आहे. आपल्यासारखे म्हटलं तर प्रगत किंवा त्याहूनही खऱ्या अर्थाने प्रगत सजीव केव्हातरी, पुठेतरी सापडतील… पण तोपर्यंत, बुद्धीचा विनाशी वापर करणारा माणूस पृथ्वीवर असेल? ‘हॅबिटेबल झोन’ ही आपल्याला

[email protected]