
>> अरुण
मानवी इतिहासाने अनेक महानगरं निर्माण होताना पाहिली आणि अनेक शहरांचा विनाशही अकल्पितपणे होताना पाहिला. तसे दाखले आपल्य्याकडेही आहेत. लाभेळ आणि डोळावीरा येथे उत्खननातून साकारलेली भव्य महानगरं म्हणजे मोहेजोदारो-हडप्पा संस्कृतीचं संचित.
इटली देशातल्या आताच्या नेपल्सजवळ असंच एक विशाल नगर होतं. त्याचं नाव पाम्पेडू… जे संकट आलं ते आकाशातून. त्याला कारणीभूत ठरला व्हेमुव्हिअल नावाचा, इटलीमधलाच ज्वालामुखी. सन 79मध्ये त्याला अचानक `जाग’ आली. तो आग, धूर आणि राख मोठय़ा प्रमाणावर ओकू लागला. गेल्या 23 नोव्हेंबरला इथिओपियातील ज्वालामुखीने उत्सर्जित केलेली राख जशी पूर्वेकडच्या देशांपर्यंत गेली, तसाच हा पाम्पेइचा उत्पात होता.
यातील महत्वाचा फरक म्हणजे, हथिओपियन ज्वालामुखीची राख मोठय़ा प्रमाणावर समुद्रावरून जाणाऱया वाऱयाच्या झोतांबरोबर पसरली, तर व्हेसुव्हिअस ज्वालामुखीने जवळच्याच पाम्पेइ शहराला लक्ष्य आणि `भक्ष्य’ केलं.
त्याने अक्षरश: एका गजबजलेल्या प्रगत अशा पाम्पेइ आणि हर्क्युलेनियम वसाहतींचा घास घेतला. तिथल्या माणसांवर, प्राण्यांना, काही कळण्याच्या आतच वेगाने येणारी गरम राख आणि तप्त दगडधोंडे यांचा `पाऊस’ सुरू झाला. पळ काढून जीव वाचवण्याची संधीही किती जणांना मिळाली असेल कोणास ठाऊक… आणि बघता-बघता एक सुखी जीवनाचा आस्वाद घेणारं, त्या काळाच्या दृष्टीने प्रगत असलेलं महानगर, तिथल्या कलाकृती, इमारती, प्रशस्त मार्ग आणि नियोजित घरं यासकट राखेत लुप्त झालं.
प्रसिद्ध नेपल्स नगराच्या पूर्वेकडे नऊ किलोमीटरवर असलेल्या आणि इसवी सन 79 पूर्वी 1700 वर्षं नांदत असलेल्या पाम्पेइचा 13 चौरस किलोमीटरचा विस्तार क्षणात रक्षामय झाला. या अनपेक्षित आपत्तीने भेदरलेली, खचलेली अनेक माणसं स्वत:चा बचाव करण्याच्या असफल प्रयत्नात गाडली गेली.
1863 मध्ये या भागात उत्खनन करत असताना पुरातत्त्व संशोधकांच्या नजरेसमोर हे शहर जसजसं `उलगडत’ गेलं तसतसा त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्याच प्राचीन पद्धतीचं हे नगर आज तिथल्या विध्वंसाच्या खाणखुणांसह एक पर्यटन स्थळ बनलं आहे. आणि या शहराचा विनाश करणारा ज्वालामुखीही 1944 पासून सुप्तावस्थेत गेल्याने पर्यटन केंद्र झाले आहे.


























































