अरुण जेटलींच्या निधनामुळे शिवसेनेची वैयक्तिक हानी! उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला शोक

2400

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. जेटली यांच्या निधनामुळे देशाला धक्का बसला आहे मात्र शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“अरूण जेटली यांच्या निधनामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंध ठेवणारा खांब कोसळला आहे” असे उद्धव ठाकरे म्हणाले. “जेटली यांचे व्यक्तिमत्त्व असामान्य होते. सार्वजनिक जीवनात इतका प्रदीर्घ काळ राहूनही त्यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व जपले अरूण जेटली हे निष्णात वकील व धुरंधर नेते होते. ‘संकटमोचक’ म्हणून जेटली यांनी मोदी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. शिवसेना-भाजपमध्ये नाते टिकावे असे मानणाऱ्यांपैकी जेटली होते” असे उद्धव ठाकरे यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. जेटली यांनी राजकारणात राहूनही नाती व माणसे जपली असे सांगून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की “राष्ट्रीय राजकारणातील जेटली यांचे जाणे हे राष्ट्रीय राजकारणातून साहसी व्यक्तीचे जाणे आहे आम्ही स्वतः अरुण जेटली यांचे चाहते हो तो त्यांच्या जाण्याने ठाकरे परिवार व शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली आहे”

आपली प्रतिक्रिया द्या