दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून येऊन विजयाची हॅटट्रिक करणारे नवनिर्वाचित खासदार अरविंद सावंत यांचा महाविकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. शनिवार, 15 जून दुपारी 4 ते रात्री 10 या वेळेत परळ गाव येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेना गटनेते अजय चौधरी यांनी दिली.