निवडणुकीचा मोसम मोदी पोहोचले चहाच्या मळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वतःला ‘चहावाला’ म्हणवून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आसामच्या दिब्रूगडमधील एका चहाच्या मळ्यात गेले. व्हिडिओ पॅमेऱयांच्या साक्षीने त्यांनी येथील महिला कर्मचाऱयांसोबत चहाची पाने खुडली. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. देश सिलिंडरच्या रांगेत असताना मोदी मतांसाठी चहाच्या मळ्यात रमले आहेत, अशी प्रतिक्रिया नेटकऱयांनी व्यक्त केली.