
आसामसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून रविवारी पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. आसाममध्ये 126 जागांसाठी अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. ‘आप’ने आसाम निवडणुकीसाठी आपली 14 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये अप्पर, सेंट्रल आणि लोअर आसाममधील मतदारसंघांचा समावेश आहे.
‘आप’चे आसाम राज्य प्रभारी राजेश शर्मा यांनी ही अधिकृत घोषणा केली. आपने निवडणुकीची तयारी जोमाने सुरू केल्याचे यावरून दिसून येत आहे. उमेदवारांची यादी पुढीप्रमाणे आहे.
- नौबोइचा – अच्युत दास
- देरगाव – पुलिन गोगोई
- गोहपूर – जरबोम कुतुम
- सेंट्रल गुवाहाटी – अनुरूपा डेकाराजा
- खुमताई – आशिष हजारिका
- शिवसागर – तपन गोगोई
- टिटाबर – पल्लव सैकिया
- बोकाजन – रेणुका तिमुंगपी
- विश्वनाथ – अनंत गोगोई
- रोंगानगाडी – टिकेंद्र थापा
- चेंग – जाहिदू इस्लाम खान
- नादवार – रणजीत बोरो
- पूर्व गोलपारा – जिन्ना अमीर हुसेन
- राहा – वरुण विकास दास
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ ईशान्य हिंदुस्थानात पक्षाची ताकद मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. आसाममधील राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले असून विधानसभा निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे.

























































