पुरातत्त्व डायरी – पैठणच्या इतिहासाची साक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रा. आशुतोष पाटील
[email protected]

प्राचीन नगरी प्रतिष्ठान म्हणजेच पैठणचे स्थलमाहात्म्य जाणून घेताना पुरातत्त्वीय संदर्भानंतर पुढच्या कालखंडात वेगवेगळ्या राजवंशांचे साम्राज्य या प्रदेशावर दिसून येते. शिलालेख, ताम्रपट, नाणी, परदेशी प्रवासी आणि व्यापारी यांचे संदर्भ व पुरावे आजही पैठणच्या इतिहासाची साक्ष देतात.

‘पैठण’ किंवा ‘प्रतिष्ठान’ या प्रदेशाचे स्थलमाहात्म्य जाणून घेताना त्या त्या कालखंडानुसार संदर्भ सापडतात. लिखित तसेच पुरातत्त्वीय पुराव्यांतून पैठण शहराचा उल्लेख केवळ सातवाहनांशी संबंधितच नाही, तर क्षहरात क्षत्रप या आणखी एका राजवंशाशीही जोडलेला आज्यांचा प्रमुख राजा होता नहपान. क्षहरात हे घराणे शक आणि पहलवांबरोबर भारतात आले, येथे स्थायिक झाले व काही भागांवर आपली सत्ता प्रस्थापित केली. सुरुवातीला यांचा राजा भूमक माळवा प्रदेशात आपली सत्ता वाहोता. मात्र नहपान सत्तेवर आल्यानंतर त्याने सीमांची बंधने झुगारून सातवाहनांशी थेट संघर्ष सुरू केला.

या संघर्षांचा उल्लेख काही जैन ग्रंथांमध्येही आबृहतकल्पभाष्य पीठिकानुसार, पैठणचा राजा सालिवाहन प्रत्येक पावसाळ्यात क्षहरातांची राजधानी भरुच (संस्कृतः भृगुकच्छ) वेटाकत असे. तिलोय-पण्णती ग्रंथात ‘नरवाहन’ (नहपान) हा भरुचमध्ये राज्य करत असल्याचा उल्लेख आहे आणि पैठणचा सालिवाहन त्याच्यावर आक्रमण करतो, असे नमूद केले आहे.

आवश्यकनिर्हुक्ति (श्लोक 1304) मध्ये जैन तत्त्वज्ञ भद्रबाहू यांनी या संघर्षाची एक रोचक कथा सांगितली आहे. त्यानुसार, भरुचचा राजा नहावान आणि पैठणचा सातवाहन यांच्यात दीर्घकाळ संघर्ष सुरू होता. सातवाहनाने सलग दोन वर्षे भरुचवर वेघातला, पण नहावानाचा पराभव करू शकला नाही. कारण नहावानाने व्यापाराच्या माध्यमातून खूप संपत्ती गोळा केली होती. त्यानंतर सातवाहनाने आपल्या मंत्र्याला गुप्तपणे नहावानाकडे पाठवले, ज्याने त्याचा विश्वास संपादन केला. मंत्र्याच्या सल्ल्याने नहावानाने मोठय़ा प्रमाणात दानधर्म केला, ज्यामुळे तो आर्थिकदृष्टय़ा दुर्बल झाला. परिणामी, सातवाहनाने त्याच्यावर हल्ला करून त्याचा पराभव केला.

या संघर्षाचे पुरावे शिलालेख आणि नाण्यांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. नाशिकमधील वसिष्ठीपुत्र पुलुमावीच्या कारकीर्दीत लिहिलेल्या शिलालेखात गौतमीपुत्र सातकर्णीने क्षहरात वंशाचा नाश केल्याचा उल्लेख आहे. अभ्यासकांच्या मते, गोवर्धन (नाशिकजवळ) येथे नहपान व गौतमीपुत्र यांच्यात मोठे युद्ध झाले आणि त्यात नहपान मारला गेला. युद्धानंतर गौतमीपुत्राने नहपानाची नाणी गोळा करून त्यावर स्वतचे शिक्के उमटवले व ती पुन्हा चलनात आणली. ही नाणी आजही उपलब्ध आहेत.

याव्यतिरिक्त, जरी कोणत्याही शिलालेखात नहपानाने पैठणवर आक्रमण केल्याचा स्पष्ट उल्लेख नाही, तरी नाणे त्याबाबत महत्त्वाचे संकेत देतात. पैठण येथून मिळालेली काही सातवाहन काळातील तांब्याची नाणी नहपानाने पुन टंकित केलेली आहेत. मूळ नाण्यांवर हत्ती व झाड कोरलेले होते, पण नहपानाने त्या हत्तीवर आपले वज्र व बाण अंकित केले. याशिवाय काही नाणी अशीही आज्यावर एका बाजूला वज्र, बाण आणि नहपानाचे नाव कोरलेले असून दुसऱया बाजूला झाड कोरलेले आहे. यावरून असे दिसते की, नहपानाने काही काळ पैठणवर सत्ता गाजवली असावी व तिथे स्वतंत्र नाणे टंकित केली असावीत. जरी लेखी पुरावा थेट उपलब्ध नसला तरी नाण्यांमधून सातवाहन-क्षहरात संघर्षाची खात्रीशीर माहिती मिळते.

असे म्हणता येईल की, पैठण हे सातवाहनकालीन एक समृद्ध शहर होते आणि त्याचा विकास सातवाहनांच्या काळात झाला. टॉलेमीच्या काळात ते एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि संभवत सातवाहन राजा श्री पुलुमावीचे ‘राजकीय निवासस्थान’ होते. पैठणविषयीच्या लोककथा व मिथके कदाचित सातवाहन काळाशीच संबंधित असावीत, परंतु हे अधोरेखित करणे आवश्यक आहे की कोणताही स्पष्ट व निश्चित पुरावा आज उपलब्ध नाही की पैठण सातवाहनांची राजधानी होते.

पैठण हे कालानुरूप बदलत आलेले आणि अनेक अंगांनी संपन्न असलेले शहर आहे. प्रारंभिक मध्यकाळात पैठण हे ब्राह्मण धर्माचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले, त्याच कारणास्तव ते अनेक ग्रंथामध्ये उल्लेखित झाले. मरणोत्तर मोक्षप्राप्तीसाठी केली जाणारी कार्य पैठणच्या गोदावरी तीरी केली जाऊ लागली. याच काळात नदीला दक्षिण गंगा म्हणून महत्त्व प्राप्त झाले असावे. एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून पैठण उदयास आले, ब्रह्म पुराणात प्रतिष्ठानची कथा असलेल्या ‘प्रतिष्ठान महात्म्य’चाही समावेश आहे. त्यापुपैठणचा धार्मिक अंगाने विकास होत राहिला आणि आज ‘दक्षिण काशी’ म्हणून पैठण नावारूपाला आलेले आहे.

उत्तर सातवाहन काळात या शहरात दोन विटांच्या मंदिरांची निर्मिती झाली होती असे उपलब्ध पुरातत्वीय अवशेष सांगतात. सर्वप्रथम युसूफ नामक संशोधकाने 1937 साली दोन प्राचीन मंदिरांच्या असण्याची शक्यता वर्तवली होती. इ. स. 1998 आणि इ. स. 1999 या दोन वर्षी पैठण येथे उत्खनन झाले. या उत्खननात दोन मंदिरांचे अवशेष संशोधकांना सापडले. त्यांना उत्तर मंदिर आणि दक्षिण मंदिर असे नामाभिधान त्यांनी दिले. या मंदिरांचा काळ त्यांनी इ. स. 5 वे ते इ. स 8 वे शतक असा निश्चित केला. हे संरचनात्मक अवशेष आपल्या ज्ञानात महत्त्वाची भर टाकतात. कारण या कालावधीत महाराष्ट्रात निर्माण झालेल्या फार कमी विटांच्या मंदिरांची माहिती आपल्याला आहे. हे मंदिर त्या काळातील मंदिर स्थापत्यशास्त्राच्या विकासाचा एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन प्रदान करतात. उत्तर मंदिराच्या बाबतीत आपण त्याच्या विकासाची प्रक्रिया पाहू शकतो, जी एक साध्या देवळापासून सुरू झाली. दक्षिण मंदिराच्या बाबतीत अशी विकासाची प्रक्रिया घडली नाही. उत्तर मंदिराचा विकास एका छोटय़ा गर्भगृहापासून ते मोठय़ा मंदिरापर्यंत त्याचा विकास आपल्याला झालेला दिसतो.

पैठणबद्दल अनेक अंगाने लिहिले जाऊ शकते. कारण हे शहर ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा अनेक अंगाने संपन्न राहिले आहे. प्राचीन काळापासून या शहराची भरभराट होत राहिली. सातवाहनांसारखे बलाय़ साम्राज्य पाहिले, परदेशी व्यापारी पाहिले, उभी राहणारी सभ्यता पाहिली. ताम्रपट, शिलालेखांसारखे अनेक पुरावे आजही त्या इतिहासाची साक्ष देतात. या संपूर्ण भरभराटीला कारण ठरली ती दक्षिण गंगा आणि त्याच दक्षिण गंगेने ‘प्रतिष्ठान’ला बनवले ‘दक्षिण काशी!’
(लेखक पुरातत्त्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)