
हिंदुस्थानच्या हवाई दलाची ताकद आणखी मजबूत होणार आहे. कारण हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच अस्त्र एमके- 1 बियॉण्ड व्हिज्युअल रेंज (बीव्हीआर) मिसाईल येणार आहेत. हवाई दलाने स्वदेशी अस्त्र एमके-1 क्षेपणास्त्रांच्या खरेदीची तयारी सुरू केली आहे. शत्रूवर 100 किमी अंतरावरून वार करण्याची या क्षेपणास्त्रांची क्षमता आहे. शत्रूच्या जॅमरला ते जुमानणार नाहीत. ‘अस्त्र एमके-1’ क्षेपणास्त्रs डीआरडीओने विकसित केली आहेत, तर भारत डायनेमिक्स लिमिटेड ही कंपनी निर्मिती करत आहे. 400 क्षेपणास्त्रs खरेदी केली जाणार आहेत.
n ‘अस्त्र एमके-1’ हे एअर टू एअर मिसाईल आहे.
n 110 किलोमीटर मारक क्षमता आहे. वेग सुमारे Mach 4.5 इतका जबरदस्त आहे.
n 15 किलोचा हाय-एक्सप्लोसिव्ह वॉरहेड
n शत्रूंच्या विमानांना न बघताच मारण्याची क्षमता. शत्रूच्या जॅमरलाही जुमानणार नाही.
n अस्र एमके- 2 आणि अस्त्र एमके- 3 रेंज अनुक्रमे 160 किमी आणि 350 किमी असेल.
n सध्या हे मिसाईल Su-30MKI वर तैनात आहे.
n आतापर्यंत हिंदुस्थान रशिया आणि फ्रान्सच्या क्षेपणास्त्रांवर हिंदुस्थानला अवलंबून रहावे लागायचे. मात्र अस्त्र एमके-1 मुळे अन्य देशांवर अवलंबून रहावे लागणार नाही.
n आणखी 400 ‘अस्त्र एमके-1’ क्षेपणास्त्रs आल्याने हवाई दलाची मारक क्षमता वाढेल.




























































