
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या वापरासाठी आकारल्या जाणाऱ्या टोलमध्ये 50 टक्के सवलत आणखी एक वर्ष कायम ठेवण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाने 4 जानेवारी 2024 रोजीच्या बैठकीत अटल सेतूच्या वापरासाठी 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणेच पुढे 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत पथकर आकारण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर इतर वाहनांसाठी एकेरी प्रवासाचा पथकर दरही निश्चित करण्यात आले आहेत.



























































