बांगलादेशात आरक्षणाविरोधात करण्यात आलेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे शेख हसीना यांना पदाचा राजीनामा देऊन बांगलादेशातून पलायन करावे लागले. त्यानंतर तब्बल 48 जिह्यांमध्ये 278 ठिकाणी हिंदूंवर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे.
लोकशाहीत कुणी हिंदू किंवा मुस्लिम नाही – मोहम्मद युनूस
लोकशाहीत कुणी हिंदू किंवा मुस्लिम नाही. सर्वांसाठी अधिकार समान आहेत, असे बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी म्हटले असून हिंदूंनी शांतता राखावी, असे आवाहन केले आहे.
शेख हसीना आणि अन्य सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकेने हसीना यांचे आरोप फेटाळले आहेत.