
विधान भवनाच्या गेटबाहेर आज एका व्यक्तीने अंगावर लिक्विड टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी वेळीच त्याला रोखत ताब्यात घेतले. त्यांनी अंगावर जे लिक्विड ओतले ते अज्वलनशील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.
आज दुपारच्या सुमारास ज्योतीराम चव्हाण हा व्यक्ती सोबत एका बाटलीतून लिक्विड विधान भवनाच्या गेटजवळ घेऊन आला आणि त्यांनी बाटलीतून आणलेले ते लिक्विड अंगावर टाकण्यास सुरुवात केली. हा प्रकार नजरेस पडताच तेथे तैनात पोलिसांनी त्याला रोखले आणि ताब्यात घेऊन निघून गेले. त्या व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी अंगावर ओतलेले ते लिक्विड हे शीतपेय असल्याचे सूत्रांकडून कळते. ज्योतीराव हे मूळचे लातूरच्या रेनापूरचे असून त्यांच्या शेतातून रस्ता जात असल्याने त्याच्या विरोधात त्यांनी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते.

























































