
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात, चौखांबी, श्री संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल सभामंडप आदी प्रमुख ठिकाणी अत्यंत आकर्षक व देखणी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
या सजावटीसाठी सुमारे चार ते साडेचार टन फुलांचा वापर करण्यात आला असून त्यामध्ये गुलाब, अस्टर, लाल व पिवळा झेंडू, जरबेरा, ऑर्किड, शेवंती, बिजली आदी विविध प्रकारच्या व रंगांच्या फुलांचा समावेश आहे. संपूर्ण सजावट अत्यंत कलात्मक पद्धतीने साकारण्यात आली असून यासाठी 50 ते 60 कुशल कारागिरांनी अथक परिश्रम घेतले आहेत. सदरची फुलांची सजावट श्री विठ्ठल भक्त भारत दिलीप भुजबळ (पुणे) यांनी सेवाभावी वृत्तीने व पूर्णतः मोफत स्वरूपात करून दिली आहे. या आकर्षक फुलसजावटीमुळे मंदिर परिसर अधिकच मनोहारी व भक्तिमय झाल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

























































