
स्पष्टवत्तेपणा आणि अनेक विषयांवर परखड मते मांडणारे अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सध्याच्या जागतिक घडामोडींवर भाष्य करून लक्ष वेधून घेतले आहे. ‘‘लोकशाहीत वेडा राजा वेळीच म्हणजे निवडून देण्याआधीच, ओळखणाऱ्या जनतेला शहाणी जनता म्हणतात,’’ अशी त्यांनी पोस्ट लिहिली आहे. तसेच मुत्सद्देगिरीचा खेळ हा मैदानात जिंकला जात नाही, तो प्रत्यक्ष जगातील परिणामांतून जिंकला जातो, असेही ट्विट त्यांनी केले आहे. अतुल कुलकर्णी अनेकदा सामाजिक विषयांवर निर्भीडपणे मत व्यक्त करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात प्रश्न उपस्थित केला होता. ‘महाराज’ पकडले गेले तरच भोंदू, मग आधी कोण असतात, असा सवाल त्यांनी केला होता.





























































