सिक्रेट मिशनने वाचवली ऑस्ट्रेलियातील दुर्मिळ झाडे

497

वुलेमी पाइन्स ही ऐतिहासिक झाडे दुर्मिळ आहेत. डायनासोरसारख्या अक्राळविक्राळ आकारात वाढणाऱया या झाडांपैकी दोनशेहून अधिक झाडे ऑस्ट्रेलियातील काही तज्ञ अग्निशमन जवानांनी एका सिक्रेट मिशनद्वारे सिडनीमधील अग्नितांडवातूनही वाचवली. ही झाडे लावण्यात आल्याचे जसे गुप्त ठेवण्यात आले होते, तसेच त्यांना आगीपासून वाचवण्याची प्रक्रियाही गुप्त ठेवण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्याचे पर्यावरणमंत्री मॅट कीन यांनी या ‘वुलेमी पाइन्स’ झाडे बचाव मोहिमेला ‘अनप्रिसेडेन्टेड एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन मिशन’ असे नाव दिले आहे. जगात कुठेही सापडणार नाहीत अशा या दुर्मिळ ‘वुलेमी पाइन्स’ झाडांचे संवर्धन सिडनीतील जागतिक वारसा असलेल्या ब्लू माऊंटन भागात गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. नेमक्या त्याच ठिकाणी झाडांना मोठी आग लागली. गेल्या दोन-तीन महिने या आगीने जंगलात तांडव माजवले होते. मात्र वुलेमी पाइन्स ही झाडे ज्या ठिकाणी लावण्यात आली आहेत त्याच्या भोवती अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याची अशी व्यवस्था केली होती, ज्यामुळे भर जंगलाला आग लागूनही या दुर्मिळ झाडांना आगीची झळही पोहोचू शकली नाही, असे अधिकाऱयांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या