सामना ऑनलाईन
2212 लेख
0 प्रतिक्रिया
सोमवारपासून माथेरानमध्ये ई-रिक्षांचा बेमुदत बंद; सनियंत्रण समिती विरोधात संताप, 54 हात रिक्षाचालकांच्या नशिबी नरकयातनाच
निसर्गरम्य माथेरानमधील हाताने रिक्षा ओढण्याची अमानवी प्रथा बंद करण्यासाठी सर्व चालकांना ई-रिक्षा द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सनियंत्रण समितीला दिले होते. पण हे आदेश...
रायगडात मोहोर काळवंडला; आंबा धोक्यात, ढगाळ वातावरण, उष्णतेचा पारा वाढू लागल्याने बागा संकटात
बदलत्या हवमानाचा फटका रायगड जिल्ह्यातील आंबा पिकाला बसत आहे. ढगाळ वातावरण तसेच उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढू लागल्याने मोहोर काळवंडू लागला आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांमध्ये...
शिवडीतील बीडीडी चाळी आणि झोपडपट्टीचा पुनर्विकास करा! शिवसेनेची मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडे मागणी
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या जागेवर असलेल्या शिवडी बीडीडी चाळींचा विकास राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणानुसार करावा तसेच शिवडी पूर्व पट्टय़ातील झोपडय़ांचा पुनर्विकास त्याच जागी करण्यात यावा,...
भाजप आमदाराची आरोपी भावांना मदत, तरुणीच्या नातेवाईकांचा आरोप
स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील तरुणीच्या अपहरण प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणात दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचे नाव चर्चेत आले आहे....
ठाण्यात 25 हजार कुत्र्यांना रेबीजची लस; पालिकेची 50 जणांची टीम आजपासून रस्त्यावर
भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने मिशन रेबीजमुक्त ठाणे ही मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत उद्यापासून एक महिना तब्बल २५ हजार कुत्र्यांना...
ईव्हीएम हॅकिंगचे पुरावे कोर्टाला देणार, हिंमत असेल तर दावा ठोका; सत्ताधारी पक्षाचे आमदार शेळके...
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम) हॅक केल्या होत्या असा आरोप खुद्द सत्ताधारी पक्षाच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील...
छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर होणार चकाचक; शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे दर सोमवारी डीप क्लिनिंग
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर चकाचक होणार असून दर सोमवारी या परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डीप क्लिनिंग मोहीम राबविण्यात येणार...
बदलापुरात चाललंय तरी काय…चिमुकल्यांवरील अत्याचारांनंतर पैशांचे आमिष दाखवून अंडाशयांची तस्करी, पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या...
गेल्या काही महिन्यांपासून चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनांनंतर अवघ्या महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असताना आता त्याच बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी...
नागपूरमध्ये दहावीच्या परीक्षेदरम्यान मुख्याध्यापक-शिक्षकामध्ये मारामारी
नागपुरातील किदवई हायस्कूल ऍण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये शुक्रवारी दहावीचा पेपर सुरू असताना मुख्याध्यापक कक्षात सगीर अहमद आणि माजीद खान पठाण यांच्यात वाद आणि हाणामारी झाल्याचा...
राजेश नार्वेकर राज्याचे परिवहन आयुक्त
ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश नार्वेकर यांची राज्याच्या परिवहन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आज नार्वेकर यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. अन्न...
पालिकेची स्थायी समिती, शिक्षण समितीची निवडणूक बिनविरोध; अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे, राजेश्री शिरवडकर यांची निवड
मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी असणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची तर शिक्षण समिती अध्यक्षपदी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांची निवड झाली. या...
महालक्ष्मी रेसकोर्सचा विकास रिअल इस्टेटच्या फायद्यासाठी; पुनर्विकासाविरोधात 102 आर्किटेक्ट, डिझायनर्स, शहरी नियोजक एकवटले
महालक्ष्मी रेसकोर्सच्या 300 एकर जागेवर सरकारच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सेंट्रल पार्क’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी क्रीडा सुविधा, पारंपरिक हिंदुस्थानी खेळ...
ICC T20 WC 2026 – पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यात आज संघर्ष
30 महिन्यांत तब्बल 41 वेळा आमने सामने आलेले पाकिस्तान आणि न्यूझीलंड आता पुन्हा भिडणार आहेत, पण यावेळी सामना ‘फक्त आणखी एक’ असा नाही. सुपर...
ICC T20 WC 2026 – ‘सुपर एट’च्या महाभारतात अपराजितांची कुस्ती
सुपर एटमध्ये पोहोचल्यावर क्रिकेट म्हणजे साधा खेळ राहत नाही. तो बुद्धिबळ, कबड्डी आणि बॉक्सिंग यांचा एकत्रित प्रयोग होतो. सुपर एटमध्ये पोहोचणारा हिंदुस्थान अपराजित आहे....
ICC T20 WC 2026 – हिंदुस्थानची आता खरी कसोटी, अश्विनने दिला इशारा
हिंदुस्थानचा संघ म्हणजे लग्नातला तो वर जो अजून स्टेजवर नीट उभाही राहिला नाही आणि पाहुण्यांनी आधीच ‘वा! काय देखणा नवरदेव’ म्हणून टाळय़ा वाजवायला सुरुवात...
हिंदुस्थान उपांत्य फेरीत पोहोचणार, क्रिकेट दिग्गजांची एकमुखी भविष्यवाणी
टी-20 वर्ल्ड कपच्या साखळीत अपराजित असलेला हिंदुस्थानी संघ उपांत्य फेरीही थाटात गाठणार, अशी एकमुखी भविष्यवाणी हिंदुस्थानच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी वर्तवल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले आहे....
प्रशासक राजवटीत झालेल्या खर्चाची ‘श्वेतपत्रिका’ काढा! शिवसेना आक्रमक
मुंबई महानगरपालिकेने गेल्या चार वर्षात नगरसेवक पदावर नसताना विविध विकासकामांच्या नावाखाली खर्च केलेल्या हजारो कोटी रुपयांबाबत श्वेतपत्रिका काढून हिशोब द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली...
मुस्लिम समाजाचे शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान
मुस्लिम समाजाचे पाच टक्के शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. 2014 मध्ये मुस्लिम समाजातील 50 जातींना हे...
शेष मुंबई शालेय संघाने मारली बाजी
मुंबई शालेय क्रीडा संघटना आणि जेबीसीएन यांच्या पुढाकाराने आयोजित सुपर कप आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत गाइल्स शिल्ड विजेत्या ज्ञानदीप संघाला शेष मुंबई शालेय संघाविरुद्ध झालेल्या...
Women’s Asia Cup Rising Stars 2026 – श्रीलंकेला नमवत हिंदुस्थान अंतिम फेरीत
कर्णधार राधा यादवच्या अष्टपैलू वादळाने श्रीलंका ‘अ’ संघाचा चक्काचूर करत हिंदुस्थानच्या युवा महिला संघाने ‘महिला रायझिंग स्टार्स टी-20 आशिया कप’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिमाखात...
ICC T20 WC 2026 – ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय
साखळीतच बाद झालेल्या ऑस्ट्रेलियाने ओमानचे 105 धावांचे आव्हान अवघ्या 9.4 षटकांत एका फलंदाजाच्या मोबदल्यातच गाठत टी-20 वर्ल्ड कपचा आपला प्रवास मोठय़ा विजयासह संपवला. अॅडम...
भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी भिवंडीचे महापौर, महापालिकेवर काँग्रेसप्रणीत ‘सेक्युलर फ्रंट’ची सत्ता
भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांची भिवंडीच्या महापौरपदी निवड झाली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर नगरसेवक आणि काँग्रेसप्रणीत ‘सेक्युलर फ्रंट’चे उमेदवार नारायण...
Chandrapur crime news – कारल्याची भाजी बनविल्याने मुलाने आईचा खून केला, आरोपीला अटक
चंद्रपुरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कारल्याची भाजी बनवली या क्षुल्लक कारणावरून मुलाने आईची हत्या केल्याची घटना जिल्ह्यातील मूल...
जीव गेला तरी जमीन देणार नाही; शक्तीपीठ महामार्गासाठी सक्तीच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध
शक्तीपीठ महामार्ग जमीन अधिग्रहण करण्यासाठी सक्तीच्या मोजणी प्रक्रियेला परभणी जिल्ह्यातून मोठा विरोध होत आहे. परभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा, आमडापूर आणि कोठाळा या गावातील शेतकरी...
एआय सुद्धा ही समस्या सोडवू शकत नाही! दिल्लीच्या वाहतूक कोंडीवरून ऋषी सुनक यांची मिश्किल...
ब्रिटीश उच्चायुक्तालयात आयोजित एका संयुक्त सत्रासाठी ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांना पोहोचायला उशीर झाला. यावेळी दिल्लीतील वाहतूक कोंडीवर भाष्य करताना त्यांनी मिश्किल टिप्पणी...
हरदीप सिंग पुरींच्या मुठीत अशी कोणती सिक्रेट्स आहेत की मोदी सरकार कारवाईला घाबरतंय? संजय...
जगातील अनेक देशांतील सत्ता सिंहासनांना हादरे देणाऱ्या एपस्टीन फाईल्समुळे ब्रिटनच्या राजघराण्यात वादळ आले आहे. लैंगिक शोषण प्रकरणातील गुन्हेगार एपस्टीनशी संबंध आणि बलात्काराच्या आरोपांत अडकलेले...
राज्यसभेबाबत तीन पक्ष एकत्र बसून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील, संजय राऊत यांचे विधान
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांची मुदत 2 एप्रिल रोजी संपत आहे. महाविकास आघाडीकडे एका जागेसाठी आवश्यक संख्याबळ असून महाराष्ट्राच्या हितासाठी, अस्मितेसाठी काम करणारे...
Mumbai pollution – मुंबईची हवा ‘अतिधोकादायक’, एक्यूआय 242 वर पोहोचल्याने दृश्यमानता घटली
हिंदुस्थानची आर्थिक राजधानी मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 242 वर पोहोचल्याने दृश्यमानता घटली आहे. वाढलेले धुलीकण, धुरके याचा त्रास लहान...
ICC T20 WC 2026 – झिम्बाब्वेच्या ‘मिस्टर कन्सिस्टंट’ समोर भल्या भल्या गोलंदाजांनी गुडघे टेकले;...
हिंदुस्थान आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये झिम्बाब्वेच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि यजमान श्रीलंकेला...
11 महागडी विमानं पडली; मोदींना फोन करून म्हणालो, 200 टक्के टॅरिफ लावेन, तेव्हा कुठे...
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये युद्धाची ठिणगी पडली होती आणि हे युद्ध आपण रोखल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला...






















































































