सामना ऑनलाईन
3165 लेख
0 प्रतिक्रिया
मुंबई महापालिकेने 68 टन धूळ झाडली, उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
रस्त्यावरील धुळीने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने टँकरच्या माध्यमातून पाणी फवारले असून गेल्या दोन महिन्यांत 67.86 टन धूळ यंत्राच्या साहाय्याने झाडली आहे. पालिकेने तसे प्रतिज्ञापत्र...
इंडिगो प्रकरणी हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
इंडिगो एअरलाईन्सची हजारो उड्डाणे रद्द झाल्यामुळे लाखो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली....
रक्तरंजित थरार! भरवर्गात मित्राकडून मित्राचाच खून
जुन्या वादातून मित्रानेच दहावीच्या खासगी कोचिंग क्लासमध्ये शालेय विद्यार्थ्यावर चाकूने गळा आणि पोटावर वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी राजगुरू नगरमध्ये...
कांदिवली येथे पोलिसावर केला हल्ला, कॉलर पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसाची कॉलर पकडून हल्ला केल्याची घटना कांदिवलीच्या पश्चिमच्या एकता नगर येथे घडली. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...
वडील यूकेचे, आई हिंदुस्थानी; सात वर्षांच्या मुलीला मिळाले नागरिकत्व
वडील यूकेचे व आई हिंदुस्थानी असलेल्या सात वर्षांच्या मुलीला हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
या मुलीच्या वडिलांना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्याचा विषय प्रलंबित...
उच्च न्यायालयाच्या गेटबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला दिला जात नाही तसेच एक वकील पैसे परत करत नसल्याने वैतागलेल्या विरारमधील एका 45 वर्षीय व्यक्तीने उच्च न्यायालयाच्या गेटबाहेर अंगावर...
Latur Accident दोन कारची समोरासमोर धडक, भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू
लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कार यांच्यात सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू...
सेंट्रल पार्कच्या आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण 295 एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. प्रस्तावित सेंट्रल पार्कचा आराखडा आज पालिकेने...
चार जिल्ह्यांत थंडीची तीव्र लाट धडकणार, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या थंड वाऱयांमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यात धुळे, नाशिक, परभणी, सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र लाट धडकेल, असा अंदाज...
अधिवेशनात घोषणांचा पाऊस पण विदर्भ कोरडाच
>> राजेश चुरी
उपराजधानीतील कडाक्याच्या थंडीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात विदर्भाच्या शेतकऱयांच्या पदरात काही तरी पडेल अशी अपेक्षा होती. पण महानगरांतील स्थानिक...
लोको पायलटच्या प्रश्नांवर रेल कामगार सेना आक्रमक, साप्ताहिक सुट्टीसाठी दिल्लीत आवाज उठवणार
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात काम करणारे लोको पायलट अतिरिक्त डय़ुटी, सलग आठवडाभर रात्रपाळी, साप्ताहिक सुट्टीचा अभाव आदी प्रश्नांना तोंड देत आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे रेल्वे...
पोलीस 14 दिवसांत प्राथमिक चौकशी का करत नाहीत! हायकोर्टाने उपटले कान, केंद्रीय गृह मंत्रालयाला...
प्राथमिक चौकशी करण्यासाठी 14 दिवसांचे बंधन असतानाही पोलीस महिनोंमहिने चौकशी करत असतात. कायद्याचे पालन करत नाहीत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने कान उपटले.
न्या. अजय गडकरी...
पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यायलाच हवी, हायकोर्टाने ठाणे पालिकेला बजावले
उघडय़ा मॅनहोलमध्ये पडून अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहेत. केवळ मॅनहोलच नव्हे, तर रस्त्यावरील खड्डय़ांमुळेदेखील अपघाताच्या घटना घडत आहेत. प्रशासनाच्या कामचुकारपणामुळे अशा अपघातात निष्पापांचा बळी...
थलपती विजयच्या सभेला परवानगी पण पोलिसांनी ठेवल्या 84 अटी
तामीळ सुपरस्टार थलपती विजयच्या पक्षाच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या जाहीर सभेत चेंगराचेंगरी होऊन 41 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापार्श्वभूमीवर विजयच्या आगामी सभेसाठी परवानगी देण्यासाठी पोलिसांनी...
चंद्रपूर मनपातील ‘लेट लतीफांना’ आयुक्तांचा दणका , अधिकारी- कर्मचाऱ्यांना गेटवरच ठेवले ताटकळत
चंद्रपूर महानगरपालिकेत आयएएस अधिकारी नरेश आकनुरी आयुक्तपदी नियुक्त झाल्यानंतर आज सकाळी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. सकाळी दहा वाजताच्या अधिकृत कार्यालयीन वेळेत आयुक्त नरेश...
महानगरपालिका निवडणुकांचं बिगूल वाजणार, निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाची सोमवारी 15 डिसेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे....
Mundhwa Land Scam आरोपींच्या ‘सोयी’ने चौकशीचा फार्स सुरू आहे, अंबादास दानवे यांची टीका
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये अद्याप दाखल करण्यात आलेले नाही. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला...
Sydney Mass Shooting – रेस्टॉरंटमध्ये लपून प्रसिद्ध क्रिकेटपटूने वाचवले प्राण
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉन्डी बीचवर दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याच्या वेळी इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन...
शहापूरकरांचा घसा डिसेंबरमध्येच कोरडा… कडाक्याच्या थंडीत हंडे, कळशा घेऊन दोन किमीची पायपीट; विहिरी कोरड्या...
मुंबईकरांची तहान भागवणारा तालुका म्हणून शहापूरची ओळख आहे. मात्र सरकारी अनास्थेमुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था या तालुक्याची झाली असून यंदा डिसेंबर...
डोंबिवलीत तरुणाची हत्या
जुन्या वादातून तरुणाची हत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. नरेंद्र जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाश बिराजदार याने साथीदारांसह ही हत्या केली. आरोपींचा...
अपघातातील मृताच्या वारसांना 1 कोटीची नुकसानभरपाई
अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एका मोटार अपघात दाव्यात तब्बल एक कोटी पाच लाख रुपयांची विक्रमी नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. अपघातात...
नवी मुंबईत दुबार मतदारांची झाडाझडती, महापालिकेने सुरू केली विशेष मोहीम
नवी मुंबईत दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेऊन झाडाझडती सुरू केली आहे. मतदारांना आपले नाव कोणत्या प्रभागात आहे हे शोधण्यासाठी...
सिडनी बीच हल्ल्यामागे पाकिस्तान कनेक्शन, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांची माहिती
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात बॉण्डी समुद्र किनाऱ्यावर सण साजरा करणाऱ्या यहुदी नागरिकांवर बेछूट गोळीबार करणारे दहशतवादी हे पाकिस्तानचे असल्याचे समोर आले आहे. सीबीसी न्यूजने अमेरिकन...
नैसर्गिक संकटे, उत्पादन खर्चात प्रचंड वाढ, मजुरांची टंचाई; 40 हजार एकरांवरील द्राक्षबागा जमीनदोस्त
एकेकाळी सांगली जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा बनलेल्या द्राक्षबागा आज सांगलीकरांच्या दृष्टीने तोटय़ाच्या ठरू लागल्याने तब्बल 40 हजार एकरांवरील द्राक्षबागा शेतकऱयांनी जमीनदोस्त केल्या आहेत. हवामान बदलामुळे...
तिसगावातून 1400 किलो गोमांस जप्त
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील रविवार पेठेतील कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकत तीन लाखांहून अधिक किमतीचे 1400 किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरली जाणारी हत्यारे आणि जिवंत गोवंशीय...
कांदा व्यापाऱ्याची 81 लाखांची फसवणूक
अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती मार्केटमधील कांदा व्यापाऱयाची आंध्र प्रदेशातील व्यापाऱयाने कांदा खरेदी करून त्याचे पैसे न देता 81 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा...
केवळ अलाइनमेंटमध्ये बदल नको; महामार्गच रद्द करा, शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची मागणी
अलाइनमेंट बदलण्याची घोषणा म्हणजे फडणवीस यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे. केवळ सोलापूरपासून नव्हे; तर विदर्भ मराठवाडय़ातदेखील पर्यायी रस्ते उपलब्ध असल्यामुळे केवळ अलाइनमेंट बदल नको,...
बोगस बिलाच्या मदतीने करायचे आयफोनची विक्री
बाजारभावापेक्षा कमी किमतीत नवीन आयफोन बोगस बिलाच्या मदतीने विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी पाचजणांविरोधात गुन्हा नोंद केला. पोलिसांनी मोहमद...
नॅशनल पार्कमधील 25 हजार झोपड्या, झोपडपट्टीवासीयांना पक्की घरी कधी देणार? सुनील प्रभू यांचा सवाल
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पंचवीस हजार झोपडपट्टीवासीय गेल्या अनेक वर्षांपासून पक्या घरांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना पक्की घरे कधी मिळणार, असा सवाल शिवसेनेचे मुख्य प्रतोद...
मेट्रोच्या निवासस्थान वितरणामध्ये ‘वशिलेबाजी’, सेवाज्येष्ठतेचा नियम धाब्यावर; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट
मुंबई महानगरातील विविध मेट्रो मार्गिका आणि मोनोरेलचे व्यवस्थापन हाताळणाऱ्या महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनचा पक्षपाती आणि अन्यायकारक कारभार उघडकीस आला आहे. कांदिवली येथील चारकोप मेट्रो...






















































































