महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत संताप पसरला आहे. अनेक अभिनेत्रींनी त्याच्यासोबत घडलेल्या गैरवर्तनाबद्दल वाचा फोडली आहे. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे आता हळूहळू इतर चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री देखील यावर भाष्य करत आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शकांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले असून एफआयआर दाखल केले जात आहे.
सामान्य महिलांपासून आता प्रसिद्ध अभिनेत्रींपर्यंत सगळ्यांसोबत अत्याचाराच्या घटना घडत आहे. त्यामुळे अभिनेत्री आपल्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क असतात. त्यामुळे प्रत्येत अभिनेत्रीसोबत एक सुरक्षा रक्षक असतो जो त्यांचे रक्षण करेल. परंतु सुरक्षेसाठी ठेवलेल्या सुरक्षा रक्षकानेच आपल्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक दावा अभिनेत्री अविका गौरने केला आहे.
आनंदीच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच अविका गौरने हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची माहिती दिली आहे. मी कझाकस्तानमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी मी कार्यक्रमात स्टेजकडे जात असताना माझ्या बॉडीगार्डने मला मागून चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. कारण ज्यावेळी मी स्टेजवर जात होते तेव्हा माझ्यासोबत फक्त माझा बॉडीगार्डच होता.
माझ्या बॉडीगार्डने पुन्हा एकदा मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. इतक्यातच मी त्याला थांबवलं आणि त्यावर ओरडली. त्यानंतर त्याने माझी माफी मागितली होती. यांच्यासारख्या माणसांमुळे दुसऱ्या व्यक्तीवर त्याचा काय परिणाम होईल याचा ते कधीच विचार करत नाहीत असे अविका म्हणाली.