स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त बुलढाण्यात विविध पुरस्कारांचे वितरण व सन्मान

952
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ यांना विशेष पोलीस पदकाने सन्मानित करतांना पालकमंत्री डॉ. संजय कुटे

७३ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते बुलढाण्यात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत प्रथमेश समाधान जवकार (गुणवंत खेळाडू पुरुष), कु.प्रणाली प्रकाश करंडे (गुणवंत खेळाडू महिला), नितीन सोनाजी जेऊघाले (गुणवंत क्रीडा कार्यकर्ता, संघटक), श्रीराम महादु निळे (गुणवंत क्रीडा मार्गदर्शक) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच जिल्हा युवा पुरस्कार (युवक)  पुरस्कार गणेश शांताराम भोसले व जिल्हा युवा पुरस्कार (युवती)  या पुरस्काराकरीता कु.डॉ.गायत्री प्रकाश सावजी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ यांना विशेष पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. जलसंधारणामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या भारतीय जैन संघटनेच्या राजेश देशलहरा व तालुका निहाय पदाधिकाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेत मेरीट आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 चा अमरावती विभागातील प्रथम पुरस्कार सर्पमित्र कु. वनिताताई जगदेव बोराडे, मु. बोथा, पो. वरवंड, ता. मेहकर देण्यात आला. तसेच व्यंकटेश महाविद्यालय, दे. राजा यांना द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या