आयुष आणि स्वराजची सोनेरी कामगिरी

नुकत्याच हैदराबाद येथे पार पडलेल्या पाचव्या खुल्या तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेत ‘खेलो तायक्वांदो अ‍ॅकॅडमी’च्या आयुष सपकाळ आणि स्वराज सकपाळ या दोन खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली. आयुषने 17 वर्षांखालील 48 किलो वजनी गटात, तर स्वराज सकपाळने 14 वर्षांखालील 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. आयुषने सेमी फायनलमध्ये दिल्लीच्या खेळाडूवर 2-0, 4-2 अशी मात केली. अंतिम सामन्यात त्याने बंगळुरूच्या खेळाडूला 4-0, 2-1 अशा सरळ गुणांनी पराभूत केले. स्वराजनेही गुजरातच्या खेळाडूला उपांत्य फेरीमध्ये 2-1, 4-1ने हरवले, तर अंतिम सामन्यात बिहारच्या खेळाडूविरुद्ध 4-3, 7-6 असा थरारक विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या दोघांनी राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवून ‘खेलो तायक्वांदो अ‍ॅकॅडमी’सह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.