
मुंबईच्या राम मंदिर रेल्वे स्थानकावर मंगळवारी एका चित्रपटासारख्या प्रसंगात ‘रिअल लाईफ रॅंचो’ने एका महिलेचा बाळाला जन्म देण्यात मदत केली होती. मात्र या नवजात बाळाची जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. या बाळावर विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात (NICU) उपचार सुरू आहे. मंगळवारी पहाटे साधारण 1 वाजताच्या सुमारास स्थानिक रेल्वेत प्रवास करणाऱ्या एका महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि एका प्रवाशाने तत्परतेने मदतीला धाव घेतली आणि त्या महिलेची प्रसूती केली.
‘मिड डे’ ने दिलेल्या बातमीनुसार त्या नवजात बाळाला हृदयात छिद्र असल्याचं असल्याचं निदान झालं आहे. प्रसूतीनंतर आई आणि बाळाला दोघांनाही कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.