
‘आई, मी पल्लाइटवर जातोय… काळजी करू नकोस… तुझ्या तब्येतीची काळजी घे… मी पुन्हा फोन करतो…’ इरफान शेखचा आणि त्याच्या आईचा हा नेहमीचा संवाद. मात्र, हा संपाद यावेळी अखेरचा ठरला. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विमानातील 10 क्रू मेंबर्समध्ये इरफानचाही समावेश असल्याचे समोर आले आणि पिंपरीतील संत तुकारामनगरमध्ये शोककळा पसरली.
पिंपरीतील संत तुकारामनगर येथील रहिवासी इरफान समीर शेख (वय – 22) गेल्या दोन वर्षांपासून विमान कंपनीत केबिन क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता. कामाचा एक भाग म्हणून तो देशभर विमानातून प्रवास करायचा. कोणतेही विमान असो, इरफान आईला आधी कळवायचा. कोणता मार्ग, कोणती वेळ, कुठे उतरणार… असा त्यांचा संवाद ठरलेला असायचा. बुधवारी (दि. 12) दुपारी विमान उड्डाणापूर्वी इरफानने आई तस्लिमा यांच्याशी संवाद साधला आणि काही वेळातच कुटुंबीयांना विमान दुर्घटनेची माहिती मिळाली. यावेळी इरफानचा संवाद नाही, तर विमान कोसळल्याचीच बातमी आईला ऐकायला मिळाली आणि आईने हंबरडा फोडला. शेजारी, मित्रपरिवारदेखील या बातमीने सुन्न झाले, ‘माझा इरफान त्या फ्लाइटमध्ये होता…’ असे एकसारखे वडवडत आईचा अश्रूचा बांध काही केल्या चांबत नव्हता. नातेवाईकांनी धीर दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी इरफानचे आई-वडील आणि भाऊ तत्काळ अहमदाबादकडे रवाना झाले.
इरफान दोन वर्षांपासून ‘एअर इंडिया’शी जोडला गेला होता. आधी डोमेस्टिक आणि नंतर इंटरनॅशनल क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता. कुटुंबात आई-वडील, मोठा भाऊ, आजी-आजोबा असतात. शेख कुटुंबीय मूळचे साताऱ्यातील मेता येथील आहेत. गेल्या 50 वर्षांपासून पिंपरीतील संत तुकारामनगरमध्ये स्थायिक झाले आहेत. त्याच्या वडिलांचा हॉटेलला खाद्यपदार्थ पुरविण्याचा व्यवसाय आहे.
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी भावाचे डीएनए सॅम्पल
इरफानचे आई-वडील आता अहमदाबादला पोहोचले आहेत. अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी ‘डीएनए’ नमुने घेण्यात आले. इरफानच्या भावाचे सॅम्पल घेण्यात आले असून, ते जुळल्यावरच मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार असल्याची माहिती इरफानचे काका फिरोज शेख यांनी दिली.
बकरी ईदची भेट ठरली शेवटची इरफान काही दिवसांपूर्वीच बकरी
इंदसाठी तीन दिवसांची सुट्टी काढून पिंपरीत घरी आला होता. घरात हसणे, खेळणे, आईसोबतच्या गप्पाटप्पा अजूनही घरच्यांच्या डोळ्यांसमोर आहेत. इंद साजरी केल्यानंतर तो परत निघून गेला. ‘आता तर तो आमच्यातून कायमचा निघून गेला आहे. ही बातमी मनाला पटणार नाही,’ असे शेजाऱ्यांनी सांगितले. इरफानचे मित्र, शेजारी, नातेवाईक अजूनही धक्क्यात आहेत. ‘फोनवरच्या शेवटच्या बोलण्याच्या आठवणी, त्याचे फोटो आणि ‘आई… मी परत येतो…’ हे त्याचे शब्द आता काळजात खोलवर घर करून राहिले आहेत,’ असे सांगताना काका फिरोज यांना अश्रू आवरले नाहीत.
मोदी आणि अपघातग्रस्त विमान, 32 कॅमेरे 8 अँगल; फोटोसेशनवर सोशल मीडियात टीका