Badlapur Sexual Assault – बदलापुरात 144 लागू, मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

बदलापुरात दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्याचा निषेधात हजारो नागरिकांनी बदलापूर स्थानकात ठिय्या मांडला होता. आज बदलापूर स्थानकात रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे. तसेच संपूर्ण बदलापुरात कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

बदलापूरच्या आदर्श विद्यालयात एका सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. याविरोधात बदलापूरमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांनी बदलापूर स्थानकान ठिय्या मांडला होता. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक फक्त अंबरनाथपर्यंत सुरू होती. काल नऊ तास मध्य रेल्वेची वाहतूक फक्त अंबरनाथपर्यंत धावत होती. आंदोलक मागे हटत नाही म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि स्थानक रिकामं केलं.

आज सकाळपासून बदलापूर स्थानकावरची रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे. लोक लोकल पकडून कामावर जाताना दिसले. रेल्वे पोलिसांनी कालचे बदलापुरचे सीसीटीव्ही तपासले असून अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.