बदलापूरमध्ये संताप; मिंधे सरकार पोक्सो गुन्ह्यातील आरोपींना वाचवतंय का? उदय कोतवाल, तुषार आपटे, अर्चना आठवले 36 तासांनंतरही पोलिसांना सापडेनात

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्यानंतर हे प्रकरण दडपणाऱ्या आदर्श संस्थेच्या मुख्याध्यापिकेवरही पोक्सो गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होऊन ३६ तास उलटले तरी फरार असलेले उदय कोतवाल, तुषार आपटे आणि अर्चना आठवले पोलिसांना सापडत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. लैंगिक अत्याचाराचा निषेध करण्यासाठी उत्स्फूर्त आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना तत्परतेने अटक करणारे पोलीस न्यायालयाने कान उपटल्यावरही गप्प का, भाजप आणि आरएसएसशी जवळीक असल्यानेच मिंधे सरकार आरोपींना वाचवत असल्याचा संताप पदाधिकारी आणि उदय कोतवाल बदलापूरकरांचा आहे.

न्यायालयाने सरकारला धारेवर धरल्यानंतर लैंगिक अत्याचार प्रकरणाची माहिती घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने संस्थाचालकांसह मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका, दोन सेविका यांना सहआरोपी करण्याची शिफारस शासनाला केली. त्यानुसार शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे, मुख्याध्यपिका अर्चना आठवले यांच्यावर पोक्सो दाखल केला. यानंतर सर्वजण फरार झाले आहेत. गुन्हा दाखल होऊन 36 तास उलटले तरी पोलिसांना संस्थेचे पदाधिकारी सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सरकारला ‘लाडक्या बहिणीं’चा पुळका फक्त मतांसाठी असल्याचा संताप यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

सत्ताधारीच झारीतील शुक्राचार्य

पीडित मुलींची वर्गशिक्षिका, मुख्याध्यापिका व संस्थेतील पदाधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती असूनही त्यांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. तसेच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. त्यामुळेच कोतवाल, आपटे, आठवले यांच्यावर कोर्टाच्या निर्देशानुसार पोक्सो दाखल केला. ही संस्था भाजप आणि संघाशी संबंधित असल्यानेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवत असल्याचा संताप बदलापूरवासीय करत आहेत.