मराठा साम्राज्याचे समशेर बहाद्दूर पिलाजीराव गायकवाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा वटवृक्ष संपूर्ण भारतभर पसरला. त्यापैकी एक म्हणजे बडोद्याचे गायकवाड घराणे. या बडोदा संस्थानचे पहिले महाराजा होते पिलाजीराव गायकवाड. 1721 मध्ये त्यांनी सोनागढ जिंकल्यानंतर बडोदा राज्याची स्थापना केली. गुजरात भागात मराठा सत्तेची पायाभरणी करणाऱ्या पराक्रमी सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे मुख्य सहाय्यक असलेल्या पिलाजीराव गायकवाडांनी गुजरातच्या बहुतांश भागात मराठा अंमल बसविला. ज्यांची कर्तबगारी पाहून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सेनाखासखेल हा किताब दिला.

मारवाडचा राजा अभयसिंह यांचा पिलाजीराव गायकवाड यांनी दोन वेळा पराभव केला होता. मात्र त्याने कपटनीतीचा डाव खेळत महाराजा पिलाजीरावांना डाकोर येथे भेटीस येण्याचे निमंत्रण दिले व दगाफटका करीत पिलाजीरावांची हत्या करण्यात आली. गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील सावली येथे पिलाजीरावांची समाधी आहे.