संगमनेरमध्ये साडेनऊ हजार बोगस मतदार, बाळासाहेब थोरातांचा धमाका

संगमनेर मतदारसंघात साडेनऊ हजार बोगस मतदार असल्याचा धमाका कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज केला. अनेक नावे दुबार आणि काही स्थानिक नसणाऱयांची आहेत. दुसऱया मतदारसंघातील काही नावे समाविष्ट केल्याचेही दाखवून दिले, मात्र आयोगाच्या अधिकाऱयांनी याबाबत पडताळणी कsली नाही, असे थोरात म्हणाले.

आयोगाची बनवाबनवी

मतदार यादीतील चुका दुरुस्त करू असे एका बाजूला म्हणतात, तर दुसऱया बाजूला नाव वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार आम्हाला नाही, असे तहसीलदार सांगतात. अधिकाऱयांच्या माध्यमातून आयोग बनवाबनवी करत असल्याचे थोरात म्हणाले.