अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया बंदी करा! एआय समिटमध्ये मॅक्रॉन यांचे हिंदुस्थानला आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एआय इम्पॅक्ट समिट’ला संबोधित करताना मॅक्रॉन बोलत होते. सतत ऑनलाइन असलेल्या अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत मॅक्रॉन यांनी आज तीव्र चिंता व्यक्त केली. ‘जी-7 राष्ट्रांच्या आगामी परिषदेत अन्य मुद्दय़ांबरोबरच एआय आणि डिजिटल साधनांच्या धोक्यापासून मुलांचे संरक्षण यावर चर्चेला आमचे प्राधान्य असेल. जगात ज्या गोष्टींना कायद्याने बंदी आहे, त्या गोष्टींचा लहान मुलांशी संबंध येता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे,’ असे मॅक्रॉन म्हणाले.

‘ऑस्ट्रेलियाने याआधीच किशोरवयीन मुलांना सोशल मीडिया बंदी केली आहे. आम्हीही त्याच मार्गावर आहोत. ग्रीस, स्पेनसह युरोपमधील इतर देशही याच दिशेने विचार करत आहेत. पंतप्रधान मोदीदेखील या क्लबमध्ये सहभागी होतील,’ असा विश्वास मॅक्रॉन यांनी व्यक्त केला.

यूपीआयचे केले कौतुक

डिजिटल पेमेंटमध्ये हिंदुस्थानने केलेल्या प्रगतीचे मॅक्रॉन यांनी यावेळी कौतुक केले. डिजिटल पेमेंटसाठी हिंदुस्थानने उभारलेल्या यूपीआय यंत्रणेला जगात तोड नाही. हिंदुस्थानात रस्त्यावरचा विक्रेताही आज डिजिटल व्यवहार करतो हे कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले.

बिल गेट्स यांची समिटमधून माघार

एपस्टीन फाइल्समध्ये नाव आल्यामुळे वादात सापडलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी एआय समिटमधून माघार घेतली. त्यांच्या ऐवजी अंकुर वोरा हे समिटला संबोधित करणार आहेत. अनावश्यक विषयांची चर्चा होऊन समिटचा मुख्य अजेंडा झाकोळला जाऊ नये यासाठी पूर्ण विचाराअंती आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे गेट्स फाऊंडेशन इंडियाने स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियाच्या गैरवापराचा धोका लक्षात घेऊन 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी करा,’ असे आवाहन फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज हिंदुस्थानला केले.