टेबलावर केळं पाठवलं, वर्णद्वेषी व्यक्तीचे हीन कृत्य

2662

पबमध्ये टेबलवर बसलेला असताना एका कृष्णवर्णीय तरुणाला वेटरने केळं आणून दिलं. हा नेमका काय प्रकार आहे हे त्या तरुणाला कळालंच नाही. त्याने आजूबाजूला पाहिलं मात्र हे केळं कोणी पाठवलं हे त्याला कळालंच नाही. थोडा विचार केल्यानंतर त्याला केळं का पाठवलं असावं याचं उत्तर सापडलं. या घटनेनंतर हादरलेल्या तरुणाने पोलिसांना हा प्रकार कळवला.

इंग्लंडच्या केंट भागात मॅक डार्सी स्मिथ त्याच्या मित्रासोबत द रिचमल क्रॉम्पटन इन ब्रॉम्ले या पबमध्ये बसला होता. यावेळी वेटरने त्याच्यासमोर हे केळं आणून ठेवलं. या केळ्यासाठीचे पैसे भरलेले होते आणि ते वेदरस्पून अॅपच्या सहाय्याने पाठवण्यात आलं होतं. मार्कने ही  गोष्ट वर्णद्वेषी असल्याचं पबच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं.मात्र काही कर्मचाऱ्याने माझं म्हणणं गांभीर्याने ऐकून घेतलं नाही ज्यामुळे मला पोलिसांना बोलवावं लागलं असं मार्कने म्हटलंय.

मार्कला ही जागा आधी उत्तम वाटायची, मात्र या वर्षद्वेषी अनुभवानंतर या जागेबद्दल त्याच्या मनात भीती निर्माण व्हायला लागली आहे. माझं म्हणणं हॉटेलचे कर्मचारी गांभीर्याने घेत नसल्याने मला भयंकर संताप आला होता आणि मला अचानक आपण एकटे आहोत, आपल्यासोबत कोणीच नाही अशी भावना मनात निर्माण व्हायला लागली असं मार्कने म्हटलं आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना वाटत होतं की मार्कच्या टेबलवर चुकीच्या ऑर्डरमुळे केळं आणून ठेवलं आहे, मात्र हे कृत्य वर्णद्वेषी आहे हे त्यांच्या लक्षातच येत नव्हतं असं मार्कचं म्हणणं आहे. वेदरस्पून असं अॅप आहे ज्याद्वारे तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या नावाचा किंवा ठिकाणाचा खुलासा न करताही खाद्य पदार्थ पाठवू शकता. या अॅपद्वारे हे केळं पाठवण्यात आल्याने ते कोणी पाठवलं हे कळू शकलेलं नाही. मात्र हा अनुभव माझ्यासाठी वेदनादायी होता असं मार्कचं म्हणणं आहे

आपली प्रतिक्रिया द्या