वांद्रे पश्चिम येथे गजबजलेल्या हिल रोडवरील 16 बांधकामे हटवल्याने येथे होणारी वाहतूककोंडी आता फुटण्यास मदत होणार आहे. या मार्गावरील 12 दुकाने, व्यावसायिक गाळे आणि दोन कुटुंबांचे पर्यायी जागेत पुनर्वसन केल्यानंतर ही बांधकामे तोडण्यात आली. अरुंद असलेला हा रस्ता आता 27 फूट रुंदीचा झाला आहे.
वांद्रे पश्चिम येथील हिल रोड हा लकी हॉटेलपासून गॅलेक्सी अपार्टमेंटपर्यंत जातो. या मार्गाची रुंदी 27 मीटर असली तरी यातील काही भागांवर 12 दुकाने, दोन व्यावसायिक गाळे आणि दोन निवासी घरांचा समावेश होता. ही बांधकामे गेल्या अनेक वर्षांपासूनची होती. त्यामुळे रस्ता रुंदीकरणात ही बांधकामे अडथळा ठरत होती.