बंगळुरुचे काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांच्याविरोधात मंगळवारी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि एकच खळबळ उडाली. एका महिला सामाजिक कार्यकर्तीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. आता आमदार विनय कुलकर्णी यांनी संजय नगर पोलीस स्टेशनला त्या महिलेविरोधात उलट तक्रार दाखल केली असून
मिळालेल्या माहितीनुसार, विनय कुलकर्णी त्या महिलेला व्हि़डीओ कॉल करायचे आणि अश्लील बोलायचे. महिलेने बलात्कार, अपहरण आणि धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप केला आहे. त्यानंतर या प्रकरणावर कर्नाटकचे शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा म्हणाले की, न्यायव्यवस्था आपले काम करेल, खरोखरच या प्रकरणात तथ्य असेल तर न्यायव्यवस्था योग्य निर्णय घेईल.
विनय कुलकर्णी यांनी महिलेविरोधात आणि कन्नड न्यूज चॅनलच्या प्रमुखा विरोधात ब्लॅकमेल करणे आणि 2 कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. आता पोलिसांनी त्यांची ही तक्रार लिहून घेतली असून पुढील तपास सुरु आहे. विनय कुलकर्णी यांनी केलेल्या उलट तक्रारीत त्यांनी महिलेवर आणि पॉवर टीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शेट्टी यांच्यावर 2 कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.