बांगलादेशात ‘बीजेपी’ला एक जागा, सोशल मीडियात चर्चेला उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीत ‘बीजेपी’चे पानिपत झाले असून या पक्षाला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे. ही बीजेपी म्हणजे हिंदुस्थानातील भारतीय जनता पार्टी नसून बांगलादेश जातीय पार्टी आहे. मात्र, ‘बीजेपी’ या नामसाधर्म्यामुळे सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे. नेटकरी यावरून भाजपची मजा घेत आहेत.

बांगलादेशातील बीजेपी हा सत्ताधारी बांगलादेश नॅशनल पार्टीचा सहयोगी पक्ष आहे. अंदालीव रहमान पार्थो हे ‘बीजेपी’चे प्रमुख आहेत. पेशाने वकील असलेले रहमान पार्थो हे दुसऱयांदा निवडणूक जिंकले आहेत. त्यांनी जमात-ए-इस्लामीच्या नजरूल इस्लाम यांचा 30 हजारहून अधिक मतांनी दणदणीत पराभव केला. रहमान पार्थो यांचे वडील नजीउर रहमान मंजूर यांनी 2001 साली ‘जातीय पार्टी’तून बाहेर पडून बांगलादेश जातीय पार्टीची स्थापना केली होती. तेव्हापासून हा पक्ष बांगलादेशातील राजकारणात अस्तित्व राखून आहे.