बांगलादेशने चलनातून माजी राष्ट्राध्यक्षांचा फोटो हटवला

बांगलादेशच्या केंद्रीय बँकेने नव्या डिझाईनसह नवीन चलनी नोटा जारी केल्या आहेत. या नवीन चलनी नोटांवरून माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील तथा बांगलादेशचे माजी राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवण्यात आला आहे. रहमान यांच्या फोटोच्या जागी बांगलादेशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, नैसर्गिक छायाचित्रे तसेच हिंदू-बौद्ध प्रार्थनास्थळांच्या फोटोंना जागा दिली आहे. आतापर्यंत बांगलादेशच्या सर्व चलनी नोटांवर शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो होता. त्यांनी 1971 मध्ये बांगलादेशला पाकिस्तानपासून मुक्त केले.